शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर विधानसभा काँग्रेसला सोडण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 01:34 IST

गतवर्षी राष्ट्रवादीचा पराभव : खेड आणि जुन्नरमध्ये काँग्रेस भक्कम असल्याचा दावा

महाळुंगे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर व खेड या दोन विधानसभा मतदारसंघातील जागा काँग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी माझ्यासह येथील कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जगताप म्हणाले, की खेड आणि जुन्नर येथे काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. गेली अनेक वर्षे आघाडी असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून राष्ट्रवादीचे काम निष्ठेने करीत आहेत. मात्र येथे प्रत्यक्ष निवडणूक लढवून काम करण्याची संधी येथील नेत्यांना कधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असते. त्यामुळे जर येथे काँग्रेसला संधी मिळाली नाही तर येथील काँग्रेस पक्षच नामशेष होण्याची भीती हायकमांडकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा जुन्नर व खेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशामुळे येथील तरुण कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्या पाच राज्यांच्या पुनरावृत्ती महाराष्ट्रातही करण्यासाठी सध्या कार्यकर्ते प्राण पणाला लावून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यंदा या दोन्ही जागा काँग्रेसलाच सोडाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. शिवाय मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव पाहता आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे येईलच, असे मानले जात आहे.राहुल गांधींच्या विचारातील उमेदवारसध्या राहुल गांधी यांंच्या टीममध्ये सर्वत्र तरुण कार्यकर्ते नेते आहेत. पाच राज्यासह देशभरात राहुल गांधींकडून युवकांना संधी दिली जात आहे. त्याचाच फायदा जुन्नर व खेड विधानसभा मतदाससंघातील दोन्ही विधानसभा मतदारसंघांनी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहेच; शिवाय शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा त्यांना असल्याने हे नाव जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी पुढे येत आहे. माजी आमदार (स्व.) नारायणराव पवार यांचे मानसपुत्र आणि खेड तालुक्यातील एकमेव पंचायत समितीचे एकमेव काँग्रेसचे सदस्य अमोल पवार यांचे नाव खेड विधानसभा मतदारसंघासाठी पुढे येत आहे. खेड तालुक्यातील परिवर्तन आघाडीचे ते प्रमुख आहेत. ही परिवर्तन आघाडी म्हणजे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याविरोधात एकवटलेली खेड तालुक्यातील नेतेमंडळींची कार्यकारिणी यामध्ये अमोल पवार यांचे कार्य मुख्य होते. या परिवर्तन आघाडीमुळे दिलीप मोहिते यांनी २०१४ च्या विधानसभेत मोठे नुकसान सोसावे लागले आणि पराजयाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या दोघांना संधी दिली जावी, अशी मागणीही केली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेlok sabhaलोकसभा