चासकमानचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:24+5:302020-12-04T04:30:24+5:30
चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पुर्व भागातील परिसरातून जातो. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी ...

चासकमानचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी
चासकमान धरणाचा डावा कालवा खेड तालुक्याच्या पुर्व भागातील परिसरातून जातो. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर रेटवडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातील शेतकरी अवलंबुन आहे. शेतकऱ्यांनी शेतात कांदा, बटाटा, गहू व तरकारी पिके घेतली आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्यामुळे जळून जाण्याच्या मार्गावर आहे. विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच भीमा नदीला वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने अजुनही
नदीवरील बंधारे पुर्ण क्षमतेने भरले नाही. कालव्याला पाणी आल्यास पाण्याच्या गळती मुळे ओढ नाल्यांना पाणी येऊन हे पाणी थेट भिमानदी येते. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा वाढतो. धरणाच्या डाव्या कालव्या पाण्याचे पहिले आर्वतन सोडल्यास पिकांना जिवदान मिळून विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना पाणी देता येईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
मध्यतरीच्या काळात अवकाळी पाऊसाचा मोठा फटका पिकांना बसला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्या पावसाच्या फटक्यातुन वाचलेली पिके व त्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. धरणाच्या डाव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी दावडीचे माजी सरपंच संतोष गव्हाणे, संतोष सातपुते,लक्ष्मण दिघे, बाजीराव जाधव, तेजस दिघे, किसन जाधव, संजय गव्हाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो
०३ दावडी
दावडी परिसरातुन जाणारा डावा कालवा कोरडा ठणठणीत पडला आहे.