शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वटवाघळांना संरक्षण देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:18 IST

वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.

बारामती : वटवाघळांना संरक्षण महत्त्वाचे आहे; मात्र १९७२च्या वन्यजीव कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. वटवाघळांना समविष्ट करून संरक्षण द्यावे; शेतकऱ्यांना ही मोठी मदत मिळेल, अशी मागणी बारामती येथील वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी केली आहे.डॉ. गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की भारतात १२३ प्रजातींची वटवाघळे सापडतात. मात्र, त्यातील फक्त २ जातींना वन्यजीव कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले आहे. या दोन प्रजाती दक्षिण भारतात आढळून येतात. महाराष्ट्रात मात्र एकाही प्रजातीला संरक्षण नसून शासन दरबारी फक्तअनास्था आहे. याविषयी वन विभाग तर कोणतीही संरक्षणाची जबाबदारी घेत नसल्यामुळे सामान्य शेतकºयांचे नुकसान होत आहे. याची नुकसानभरपाई मिळत नाही, कारण वटवाघळांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मासे पकडण्याच्या जाळीने शेतीला चारही बाजूने संरक्षण दिले जाते. यात बागांना संरक्षण करण्यासाठी लावलेली ही जाळी शेकडो वटवाघळांसाठी प्राणघातक ठरत आहे. यात सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या नायलॉनच्या जाळ्यात अडकून अनेक वटवाघळे शिवाय अनेक प्रकारचे पक्षी मरत आहेत. यात फाल्कन, तितर, सातभाई, घुबड असे विविध पक्षी मरत असतात.कोकण, सह्याद्री भागात तर वटवाघळांचे तेल काढण्याचे छोटे कारखाने असल्याचे सर्रास पाहावयास मिळते. मात्र, हे कोणीही थांबवू शकत नाही. कारण हे पक्षी कुरतडणाºया प्राण्यांच्या गटात पूर्वीपासून समाविष्ट आहेत. शेड्युल ५ मध्ये यांचा समावेश असल्यामुळे यांना संरक्षण नाही ही विशेष बाब. या तेलाचे कोणतेही परिणाम होत नाहीत. मात्र अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांमध्ये असल्याचे मागणीवरून दिसून येते. अनेक कारखान्यांमध्ये विचारले असता, शहरी सुशिक्षित लोक याची मागणी जास्त करतात असे सांगितले जाते. आदिवासी मात्र या तेलाचा वापर कधीच करत नाहीत. मात्र, वटवाघूळ मारून आणून देतात, ते तेल बनविण्यासाठी.परदेशात मात्र वटवाघळांना १०० टक्के संरक्षण दिले आहे. भारतात वटवाघळांना संरक्षण देणे काळानुसार गरजेचे आहे. कारण इतर वन्यजीवांना जसे संरक्षण कायदा १९७२ नुसार संरक्षण दिले जाते, झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे होतात आणि शेतकºयांना भरपाई मिळते. शेतकरी आणि वटवाघूळ हा विषय अलीकडच्या काळात गंभीर होत आहे. बहुतांश भागातील शेतकरी आणि वटवाघूळ संघर्ष वाढत असून, यात अनेक ठिकाणी वटवाघळे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.फलाहारी वटवाघळे करतात नुकसानसध्या अनेक ठिकाणी बोर, द्राक्ष, सीताफळ, डाळिंब अशा फळबागांचे नुकसान काही फलाहारी वटवाघळे करीत आहेत. वटवाघूळ आपल्या वन्यजीव कायद्यानुसार मात्र यांना संरक्षण नाही त्यामुळे वन विभाग याबद्दल अजिबात सरकारी मदत देत नाही. त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे.अनेक शेतकºयांचे याबाबत प्रबोधन केले. मात्र, बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. त्याची भरपाई शासन देत नसल्यामुळे पुढील काळातदेखील या वन्यजीवांचे प्राण जाणार यात शंकाच नाही. वन विभाग म्हणजे फक्त पर्यटन आणि जंगल विकणे यासाठीच तयार केला आहे का? या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे.निसर्ग अन्नसाखळीत प्रत्येक जीव अतिशय महत्त्वाचा असून, वटवाघळ तर रात्रभर किटकांना खाऊन शेतीचे नुकसान टाळतात. तसेच फलाहारी वटवाघळ रात्रभर झाडांची पिकलेली फळे खाऊन बीज प्रसारण आणि बीजारोपण करण्याचे काम दररोज करीत असतात.मात्र १२३ पैकी फक्त ३ प्रजाती पिकलेल्या फळांच्या वासाने अशा बागांकडे आकर्षित होतात त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे धक्कादायक प्रकार राज्यभर दिसून येत आहेत. मात्र,याविषयी कोठेही संशोधन केले जात नाही, किंवा शेतकºयाला मदत मिळत नाही, ही बाब वाईट आहे.सरकारने वटवाघळासारख्या अतिमहत्त्वाच्या सस्तन प्राण्याला लवकरात लवकर संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. तसेच याबाबत सरकारला काही अडचणी असतील तर यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर वन्यजीव कायद्याने संरक्षण देण्यात यावे.

टॅग्स :PuneपुणेNatureनिसर्ग