एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:16+5:302020-12-02T04:10:16+5:30
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी ...

एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी आणि विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेणे शक्य झाले नाही. मात्र, तरीही राज्य शासनाने एमबीबीएसच्या परीक्षा येत्या ७ डिसेंबरपासून घेण्याचे जाहीर केले आहे.परंतु, या नियोजित परीक्षा शासनाने पुढे ढकलाव्यात, या मागणीचे निवेदन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पाठवले आहे.
अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले, राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने (एनएमसी) १ डिसेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावेत, असे निर्देश दिले आहेत. मात्र, महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारी २०२१ मध्ये एमबीबीएसच्या परीक्षा घेण्यात याव्यात. एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात.