पाबळ कोविड सेंटरला ऑक्सिजन बेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:03+5:302021-05-15T04:10:03+5:30
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड व येथे अधिक डॉक्टर व स्टाफ मिळावा यासाठी जिल्हा ...

पाबळ कोविड सेंटरला ऑक्सिजन बेडची मागणी
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड व येथे अधिक डॉक्टर व स्टाफ मिळावा यासाठी जिल्हा आधिकारी व आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी पाबळ येथे सांगितले.
पाबळ (ता. शिरूर) येथील कोविड सेंटर येथे भेट देऊन त्यानी पहाणी करत हँडग्लोव्हज व कोविड सेंटरला लागणारे काही साहित्य भेट दिले. येथील कोविड सेंटरमध्ये लवकर ऑक्सिजन बेड सुरू करण्यसाठी भाजप उद्योगआघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावेळी गणेश भेगडे, पाबळचे सरपंच मारुती शेळके व माजी सरपंच सोपान जाधव यांनी ३१ तारखेपर्यंत उपोषण थांबवण्याची विनंती केली असून तोपर्यंत ऑक्सिजन बेड सुरू झाले नाही तर आम्हीदेखील उपोषणास तुमच्या बरोबर बसू असे सांगितले.
यावेळी दादासाहेब सातव, आंबेगाव भाजप अध्यक्ष ताराचंद कराळे, कामगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, माजी भाजप शिरूर तालुका अध्यक्ष भगवानराव शेळके, सतीश पाचंगे, शिरूर तालुका युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रोहित खैरे, पाबळचे सरपंच मारुती शेळके, पाबळचे माजी सरपंच सोपानराव जाधव, शिरूर तालुका भाजप सरपंच आघाडी अध्यक्ष रवींद्र दोरगे, हर्षल जाधव, विठ्ठलराव वाघ, संदीप साकोरे, बापूराव ताठे भाजप ओबीसी अध्यक्ष, विशाल खरपुडे, अजित साकोरे उपस्थित होते.
--
चौकट
पाबळ (ता. शिरूर) येथील कोविड सेंटरचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आसून रुग्णांवर येथील स्टाफ, डॉक्टर चांगल्या प्रकारे उपचार करत आहेत. त्याचबरोबर जेवण व औषध उत्तम प्रकारचे दिले जात आहे. काही लोक उगाच राजकारण करत असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या ठिकाणी भव्य ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी केली आहे. येथे सुविधा उपलब्ध करण्यसाठी ते भक्कम असून करोना काळात या कोविड सेंटरवर होणारे राजकारण थांबवण्याचे आव्हान जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी केले.
--
फोटो : १४शिक्रापूर पाबळ ऑक्सिजन बेड मागणी
फोटो... पाबळ येथील कोविड सेंटरला भेट देताना भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व पदाधिकारी.