कोरोनाबाधितांची संख्या रोण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:46+5:302020-11-28T04:06:46+5:30

कोरोना आजाराबाबत यापूर्वी चांगले नियोजन होवून कार्यवाही झालेली आहे. कोरोनाबाबत दुसरी लाट येण्याबाबत विविध माध्यमातून बातम्या येत आहेत. त्या ...

Demand for measures to reduce the number of coronaviruses | कोरोनाबाधितांची संख्या रोण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

कोरोनाबाधितांची संख्या रोण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

कोरोना आजाराबाबत यापूर्वी चांगले नियोजन होवून कार्यवाही झालेली आहे. कोरोनाबाबत दुसरी लाट येण्याबाबत विविध माध्यमातून बातम्या येत आहेत. त्या विचारात घेता याबाबतची पुढील उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत गुजर यांनी व्यक्त केले आहे.

दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी व एकत्रीत येण्याने कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता लक्षात घेवून पुढील कार्यवाही व्हावी, असे अपेक्षीत आहे. बारामती शहर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा तपासणी कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यामधील संशयीत नागरिकांना बाजूला काढून त्यांचेबाबत पुढील उपचार करावेत. कोरोनाच्या तपासणी करणा-या यंत्रणाची समन्वय साधवा, रुई हॉस्पीटल व सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटल, मेडीकल कॉलेज कोविड सेंटर यांच्याबाबत सद्यस्थिती अडचणी नविन सुधारणा व उपाययोजना याबाबतची संबंधितांची चर्चा व्हावी.तसेच ऑक्सीजन गॅस पुरवठाधारक, बारामती मधील मेडीकल स्टोअर यांची मिटींग घ्यावी,अशी मागणी गुजर यांनी केली आहे.

बारामती नगरपरिषद शववाहिका, अंत्यविधी योजना यामधील अडचणी व उपाययोजना याबाबत आढावा घ्यावा.तसेच शहर परिसरामध्ये गर्दी कमी करणे- वहातूक रहदारी याबाबत पोलिस विभाग यांचेशी नियोजन करण्याची गरज गुजर यांनी व्यक्त केली आहे.

———————————

Web Title: Demand for measures to reduce the number of coronaviruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.