शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्मी’ला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 14:59 IST

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीमंतांपासून गरिबांच्या घरात केरसुणी पुजेसाठी लागतेच. प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते.

ठळक मुद्देभादलवाडीत लगबग : आंध्र प्रदेशामधून शिंदाड झाडाचे फड आयात

पळसदेव : दिवाळी सण  मोठा सण असतो. हा सण एक महिन्यावर येऊन  ठेपला असल्याने दिवाळीच्या वस्तू बनविण्यासाठी कारागिरांची ‘लगबग’ सुरू आहे. त्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व असणारी ‘लक्ष्मी’ (केरसुणी) बनविण्यासाठी कारागिर कामाला लागले आहेत.  दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीमंतांपासून गरिबांच्या घरात केरसुणी पुजेसाठी लागतेच. प्रथम या लक्ष्मीची पुजा करून इतर वस्तूंची पुजा केली जाते. त्यामुळे या लक्ष्मीला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही केरसुणी बनविण्यासाठी ‘शिंदाड’ झाडाची पाने लागतात. मात्र इंदापूर तालुक्यात ही झाडे नष्ट झाल्याने कारागिर धास्तावले आहेत. मात्र आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळण्यासाठी कारागिर शिंदाड झाडाचे फड (फांद्या) आंध्र प्रदेश राज्यातून आणून ही लक्ष्मी बनवित आहेत. हे फड वाळविणे, त्यानंतर त्याची सफाई करणे, ही कामे प्रथम करावी लागतात. परराज्यातून हे शिंदाडचे फड बंडल स्वरूपात येतात. त्यामधे  20 ते 25 लक्ष्मी होतात. इंदापूर तालुक्यातील भादलवाडीला मोठ्या प्रमाणावर केरसुनी बनविल्या जातात. येथील जवळपास वीस कुटुंब हा व्यवसाय करतात. ही लक्ष्मी बनविण्यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. याबाबत मनिषा शिंदे यांनी सांगितले की, सध्या शिंदाड झाडाचे फड मिळत नसल्याने आम्हाला आंध्र प्रदेशातून फड आणावे लागतात. खर्च मोठ्या प्रमाणात येतो. आमचा उदरनिर्वाह  याच व्यवसायावर आहे. तर भरत शिंदे यांनी सांगितले की, आधी हाताने ही केरसुणी विचरावी (पातळ करणे) करावी लागत होती. त्यासाठी वेळ लागत होता. मात्र, आता यंत्र उपलब्ध झाल्याने काम गतीमान झाले आहे. त्यामुळे त्रास ही कमी झाला आहे. दरम्यान येथील लक्ष्मीला राशीन, कर्जत, अकलूज, काष्टी, श्रीगोंदा, बारामती, दौंड, भिगवण, केडगाव, नातेपुते येथील व्यापाऱ्यांची मागणी असते. हे व्यापारी येथून या लक्ष्मी घेऊन जातात. 

टॅग्स :IndapurइंदापूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशDiwaliदिवाळी