बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:32+5:302021-03-04T04:18:32+5:30

२७ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूर शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील बिरसा मुंडा चौकात आदिवासी संघटना व समाजबांधवांच्या वतीने क्रांतिवीर भगवान बिरसा ...

Demand for installation of statue of Birsa Munda | बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याची मागणी

बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याची मागणी

२७ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रपूर शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील बिरसा मुंडा चौकात आदिवासी संघटना व समाजबांधवांच्या वतीने क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांचा ५ फुटी पुतळा बसविला आला होता. मार्च महिन्यात लोकार्पण सोहळा होणार होता. परंतु तत्पूर्वीच महापालिका प्रशासनाने कोणतीही सूचना न देता पुतळा हटविला आहे. या घटनेमुळे समस्त आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेस जबाबदार असलेल्या चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनावर अनुसूचित जातीजमाती कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून, पंधरा दिवसांत चंद्रपूर महापालिकेने त्याच जागेवर पुतळ्याची आदिवासी विधिवत पुनर्स्थापना करावी, अन्यथा बिरसा ब्रिगेड सह्याद्री व्यापक जनआंादोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. याप्रसंगी बिरसा ब्रिगेड आंबेगावचे अध्यक्ष आदिनाथ हिले, मातृशक्तीच्या प्रमुख उमाताई मते, किसन केंगले किशोर उघडे आदी उपस्थित होते.

घोडेगाव येथे तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देताना बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे कार्यकर्ते.

Web Title: Demand for installation of statue of Birsa Munda