शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी; विधी विभागातील विद्यार्थ्यांनी केला मसुदा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:39 IST

शेतकऱ्यांचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विधी विभागातील काही विद्यार्थ्यांनी शेतीतज्ज्ञ व शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून यासाठीच्या कायद्याचा मसुदाही तयार केला आहे.

ठळक मुद्दे भारतीय राज्यघटनेत शेतकऱ्यांसंबधी स्वतंत्र कलम, मात्र त्याचा वापरच नाहीहा मसुदा संसदेत मान्य झाल्यास स्वतंत्र न्यायाधिकरण अस्तित्वात येईल : सरोदे

पुणे : देशातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांना दाद मागता यावी व त्वरीत निकाल व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विधी विभागातील काही विद्यार्थ्यांनी शेतीतज्ज्ञ व शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून यासाठीच्या कायद्याचा मसुदाही तयार केला आहे.खासदार राजीव सातव यांच्याशी याविषयी संपर्क साधण्यात आला असून त्यांनी लोकसभेच्या येत्या अधिवेशनात खासगी विधेयक म्हणून हा मसुदा मांडण्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले आहे. विधीज्ञ असीम सरोदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय कृषी उत्पादन भाव निश्चिती न्यायाधिकरण कायदा २०१८ असे या मसुद्याचे नाव असेल अशी माहिती सरोदे यांनी दिली. शेतकऱ्यांवरच्या अन्यायाचे विविध दावे या स्वतंत्र न्यायालयात चालवता येतील असे ते म्हणाले.शेतमालाला आधारभूत भाव न मिळाल्याने देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. भारतीय राज्यघटनेत शेतकऱ्यांसंबधी स्वतंत्र कलम आहे, मात्र त्याचा वापरच केला जात नाही. त्याविरोधात दाद मागण्यासाठी देशात कुठेही स्वतंत्र यंत्रणा नाही. हा मसुदा संसदेत मान्य झाल्यास स्वतंत्र न्यायाधिकरण अस्तित्वात येईल व शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळेल असा दावा सरोदे यांनी केला.हा मसुदा तयार करण्यासाठी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी दीपक चटप, वैष्णव इंगोले, राकेश माळी, अमीर शेख यांनी काम केले. ते करताना त्यांना डॉ. विश्वंभर चौधरी,  शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक डॉ. गिरीधर पाटील, किसानपूत्र आंदोलनाचे संस्थापक अमर हबीब यांचे साह्य झाले. शेतकरी व शेतीप्रश्न यांचा अत्यंत बारकाईने या मसुद्यात विचार करण्यात आला आहे. देशातील सर्वच खासदारांनी त्याचा विचार करावा, असे आवाहन सरोदे यांनी केले.

टॅग्स :Puneपुणे