हडपसर-उरुळी कांचन विद्यार्थी बसची मागणी
By Admin | Updated: July 5, 2014 22:08 IST2014-07-05T22:08:16+5:302014-07-05T22:08:16+5:30
विद्याथ्र्यासाठी हडपसर ते उरुळी कांचन अशी खास बस उपलब्ध करून देऊन त्यांना होणा:या त्रसापासून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी येथील पालकवर्गाने पीएमपी प्रशासनाकडे केली आहे.

हडपसर-उरुळी कांचन विद्यार्थी बसची मागणी
उरुळी कांचन : विद्याथ्र्यासाठी हडपसर ते उरुळी कांचन अशी खास बस उपलब्ध करून देऊन त्यांना होणा:या त्रसापासून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी येथील पालकवर्गाने पीएमपी प्रशासनाकडे केली आहे.
हडपसर ते उरुळी कांचन पीएमपी बसने उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, लोणी, कदमवाकवस्ती, मांजरी, शेवाळवाडी या व इतर अनेक ठिकाणांहून हजारो मुले-मुली उच्च शिक्षणासाठी हडपसर वा पुण्याला जा-ये करतात. कामगारवर्ग, व्यापारीवर्गही बहुसंख्येने बसने प्रवास करतो; मात्र हडपसर येथील बसस्थानकावरील प्रवाशांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचा पुरता बोजवारा वाजल्याने कॉलेज सुटल्यानंतर हे विद्यार्थी व नागरिक घरी सुखरूप पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
पूर्वी हा बस मार्ग क्रमांक 7 स्वारगेट ते उरुळी कांचन असा होता व तो चांगल्या फायद्यातही चालत होता; पण त्याचीही प्रशासनाने वाट लावून प्रवाशांना बळजबरीने (ब्रेक जर्नी) तुकडे-तुकडे करून प्रवास करण्यास भाग पाडले आहे.
ही वस्तुस्थिती वेळोवेळी
उरुळी कांचन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी
पीएमपी प्रशासनाकडे मांडली आहे. (वार्ताहर)
4यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाया जातोच; पण तो प्रवास आर्थिकदृष्टय़ा महागही पडतो. प्रचंड गर्दी व गैरव्यवस्था यांमुळे ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला यांना तर एकटय़ाने प्रवास करणो अवघडच होऊन बसले आहे. त्यांना कोणी तरी बरोबर घेऊनच प्रवास केला तर जमते, नाही तर चेंगराचेंगरीत सापडून दुखापत झाल्याशिवाय राहत नाही. तसेच, कॉलेज विद्यार्थिनींनाही चेंगराचेंगरी, धक्काबुक्की, टिंगलटवाळी या प्रसंगांना सतत सामोरे जावे लागते.