शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके यांचा धडा वगळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:30 IST

डीएसके यांना अार्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातील डीएसके यांचा धडा वगळण्याची मागणी करण्यात येत अाहे.

पुणे : घराला घरपण देणारी माणसं या टॅगलाईन खाली जाहीरात करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याच घराला घरपण राहिलं नाही. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या अाराेपाखाली डीएसके तुरुंगात अाहेत. डीएसकेंचा व्यवसाय, त्यांचे कार्य लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमाच्या यशाेगाथा या पुस्तकात 'वास्तू उद्योगाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी' अशा मथळ्याखाली एक धडा 2013 साली समाविष्ट करण्यात अाला हाेता. डीएसकेंना अार्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्याने अाता हा धडा पुस्तकातून वगळण्याची मागणी करण्यात येत अाहे. 

    डीएसके यांच्यावर विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या यशाेगाथा या अभ्यासमंडळ मान्यताप्राप्त पुस्तकात  'वास्तू उद्योगाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी' अशा मथळ्याखाली एक धडा आहे. हे पुस्तक 15 जून 2013 राेजी छापण्यात अालं हाेतं. दरम्यान गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नीला अार्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात अाली अाहे. त्यामुळे विद्यापीठाने हा धडा अाता वगळावा अशी मागणी करण्यात येत अाहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अामदार हेमंत टकले हाच मुद्दा गुरुवारी अधिवेशनात उपस्थित करणार अाहेत. त्याचबराेबर संभाजी ब्रिगेडकडून विद्यापीठाला निवेदन देण्यात अाले असून हा धडा वगळण्याची मागणी केली अाहे. तसेच मागणी मान्य न केल्यास विद्यापीठासमाेर पुस्तकाची हाेळी करण्यात येईल, तसेच संभाजी ब्रिगेड अांदाेलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी दिला अाहे. 

    याविषयी बाेलताना टकले म्हणाले, 2013 साली डीएसके यांची यशाेगाथा सांगणारा धडा वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात अाला हाेता. इतक्या वर्षानंतर अभ्यासमंडळाने अभ्यासक्रमाचा अाढाव घेणे अावश्यक हाेते. शिक्षकांनी हा धडा शिकवताना डिएसके हे उद्याेगपती म्हणून शिकवायचं की घाेटाळ्यातील अाराेपी म्हणून असा प्रश्न निर्माण झाला अाहे. त्यामुळे या धड्याचा फेरविचार व्हावा असा अाैचित्याचा मुद्दा गुरुवारी अधिवेशनात उपस्थित करणार अाहे.  

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीnewsबातम्या