बलात्काराच्या फोटोंवरुन विवाहितेकडे कोटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST2021-07-16T04:09:46+5:302021-07-16T04:09:46+5:30

पुणे : एका विवाहितेला ‘फेसबुक फ्रेंड’ने ‘ब्लॅकमेल’ करत तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. आरोपीने या विवाहितेवर बलात्कार ...

Demand for crores from rapist to married woman | बलात्काराच्या फोटोंवरुन विवाहितेकडे कोटीची मागणी

बलात्काराच्या फोटोंवरुन विवाहितेकडे कोटीची मागणी

पुणे : एका विवाहितेला ‘फेसबुक फ्रेंड’ने ‘ब्लॅकमेल’ करत तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. आरोपीने या विवाहितेवर बलात्कार करत त्याचे चित्रीकरण केले होते. हे फोटो आणि व्हिडिओ विवाहितेला परत देण्याच्या बदल्यात त्याने पैशांची मागणी केली.

सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय ३४, रा. पतियाळा, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत फेसबुकवरुन संपर्क साधला होता. ओळख वाढल्यानंतर तो पतियाळावरुन पुण्यात तिला भेटायला आला होता. तेथे त्याने तिच्याच फ्लॅटमध्ये तिला सरबतातून गुंगीचे औषध दिले. ती गुंगीत असताना तिच्यावर बलात्कार केला. याचे त्याने फोटो काढले आणि व्हिडिओ चित्रिकरण केले. तसेच विवाहितेचे मंगळसूत्रही त्याने काढून घेतले होते. बलात्काराचे फोटो आणि चित्रिकरण त्याने स्वत:च्या ‘स्टेटस’ला ठेवले होते. मंगळसूत्र, फाेटो व व्हिडिओ चित्रिकरण परत देण्याच्या बदल्यात त्याने विवाहितेकडे १ कोटी रुपयांची मागणी केली. यासाठी तो वारंवार फोन, मेसेज आणि व्हिडिओ कॉल करुन तिला धमकी देत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Demand for crores from rapist to married woman