दोन सत्रात न्यायालय सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:44+5:302020-11-29T04:04:44+5:30
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज दोन सत्रात सुरू ठेवण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा वगळता राज्यातील ...

दोन सत्रात न्यायालय सुरू ठेवण्याची मागणी
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज दोन सत्रात सुरू ठेवण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांतील न्यायालयांचे कामकाज दोन सत्रात सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुणे शहर आणि जिल्ह्यात असलेल्या सर्व न्यायालयांचे कामकाज एकाच सत्रात सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे वकील वर्ग आर्थिक संकटात सापडला असून अन्य जिल्ह्यांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज दोन सत्रात सुरू ठेवण्याची परवानगी द्याावी, अशी मागणी वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आली आहे. कोरोनामुळे, मार्च महिन्यांपासून न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. सध्या एकाच सत्रात न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे वकिल वर्गापुढे संकट उभे राहिले आहे. विशेषत: कनिष्ठ वकिलांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा वगळता राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज दोन सत्रात सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी आखून दिलेल्या नियमावलींचे पालन करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.पुण्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अन्य शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत नाही, असा समज न्यायालयीन प्रशासनाचा झाला असावा. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज हे अपवाद करून एकाच सत्रात सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी भावना वकिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्यभूमीवर पणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सतीश मुळीक यांनी, पुणे जिल्ह्यात नवीन नियमावलीनुसार न्यायालय दोन सत्रात सुरु ठेवण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष वसंतराव भोसले यांच्याकडे