अवैध धंदे बंद करण्याची मागणी

By Admin | Updated: January 18, 2016 01:09 IST2016-01-18T01:09:23+5:302016-01-18T01:09:23+5:30

वेल्हे तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी वेल्हा

The demand for the closure of illegal businesses | अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अवैध धंदे बंद करण्याची मागणी

मार्गासनी : वेल्हे तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तालुक्यातील दारूधंदे व मटका, ताडीविक्री अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा
वेल्हे राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. या संबंधीचे निवेदन वेल्हे पोलिसांना दिले आहे, अशी माहिती तालुका अध्यक्ष तानाजी मांगडे यांनी दिली. ऐतिहासिक असा वेल्हा तालुका हा निसर्गाने नटलेला असून, राजगड व तोरणा यासारखे किल्ले सौंदर्यात मोलाची भर घालत आहेत. या तालुक्यास अवैध धंद्यांनी ग्रासले असून, तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळली आहे.
अवैध धंदे पोलिसांच्या वरदहस्ताने जोमात सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
अंबवणे, अस्कवडी, विंझर, वेल्हे आदी गावांमधून गावठी दारूसह देशीदारूतसेच ढाबे, ठराविक हॉटेलमध्ये सर्रासपणे विक्री होत आहे. या अवैध दारूधंद्यांकडे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष झाले आहे. विक्रेते व पोलीस यांच्यामध्ये
आर्थिक हितसंबंध असल्याची दबकी चर्चा आहे.
वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. पठाण व तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन दिले. या वेळी युवक
अध्यक्ष किरण राऊत, विद्यार्थी
अध्यक्ष हनुमंत कार्ले, सर्वेश
सुतार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: The demand for the closure of illegal businesses