चित्रपटगृह मालकांची मागणी प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:21+5:302020-12-13T04:27:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नुकत्याच पाडण्यात आलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ‘विजय टॉकीज’च्या जागी उभारण्यात येणाऱ्या नवीन वास्तूतही एक चित्रपटगृहही ...

चित्रपटगृह मालकांची मागणी प्रलंबितच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नुकत्याच पाडण्यात आलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ‘विजय टॉकीज’च्या जागी उभारण्यात येणाऱ्या नवीन वास्तूतही एक चित्रपटगृहही असणार आहे. एकपडदा चित्रपटगृह चालकांना चित्रपटगृह पाडल्यानंतर बांधल्या जाणाऱ्या नवीन इमारतीत पुन्हा पुन्हा चित्रपटगृह बांधणे कायद्याने बंधनकारक आहे.
“आम्हाला चित्रपटगृहाव्यतिरिक्त नवीनच व्यवसाय करायचा आहे. मात्र अजूनही सरकारच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत,” असे पुणे एक्झिबिटर्स असोसिएशनने अध्यक्ष सदानंद मोहोळ यांनी या संदर्भात सांगितले.
‘विजय टॉकीज’प्रमाणेच पुण्यात १४ एकपडदा चित्रपटगृहे आहेत. मात्र हा व्यवसाय तोट्यात असल्याने आम्हाला तो बंद करुन नवा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. तशी आमची मागणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. त्यावर निर्णय झालेला नाही, असे मोहोळ यांनी सांगितले.