शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची खेड बाजार समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:11 IST

कांदा निर्यातीवरील सर्व निर्बंध उठविण्याची मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती चंद्रकांत इंगवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

- हनुमंत देवकरचाकण : कांदा निर्यातीवरील सर्व निर्बंध उठविण्याची मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती चंद्रकांत इंगवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गरवा जातीचा लाल कांदा विक्रीस येत असून बाजार समितीच्या आवारात दररोज २५ ते ३० हजार क्विंटल म्हणजेच ६० हजार पिशव्यांची विक्री होत आहे.भविष्यात सदर आवक वाढण्याची शक्यता आहे. परंतु नुकतेच केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने किरकोळ बाजारातील वाढत्या कांदा दरावर नियंत्रण आणण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत लेटर ऑफ क्रेडिट सह कांद्याचे किमान मूल्य ( एम इ पी ) ७०० अमेरिकन डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय कांदा अन्य देशांच्या तुलनेत महाग पडत असल्याने परदेशातून भारतीय कांद्याची मागणी अत्यंत कमी झालेली आहे. येथील व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा जास्त प्रमाणात निर्यात होत नसल्याने कांदा बाजारभावात दररोज घसरण होत आहे.मागील आठवड्यात सर्वसाधारण ३०००/- प्रति क्विंटल दराने विक्री होणारा गरवा कांदा आज मितीस २०००/- प्रति क्विंटल दराने म्हणजे तब्बल १०००/- प्रति क्विंटल कमी दराने विक्री होत आहे. सध्या बाजार आवारात विक्रीस येणाऱ्या गरवा कांद्याचे आयुष्य अत्यंत कमी असल्याने सदरचा कांदा काढणीनंतर लगेच विक्री करावा लागतो. त्यामुले येथील शेतकऱ्यांना सदरचा कांदा मिळेल त्या भावात विक्री केल्याशिवाय पर्याय नाही.सध्या पुणे जिल्ह्यासह नाशिक, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील बाजार समित्यांच्या बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस येत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील नवीन गरवा कांदा व गुजरात, मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा बाजारात दाखल झाल्याने सदरचा कांदा उत्तर भारतात कमी खर्चात पोहोचत असल्याने पुणे जिल्ह्यातील कांद्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यातील कांदा उत्पादनाचा विचार करता देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा शिल्लक राहणार असल्याने अतिरिक्त कांदा निर्यात होणे गरजेचे आहे.तसेच केंदात शासनाने कांद्यासाठी लागू केलेले ७०० अमेरिकी डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य व लेटर ऑफ क्रेडिट ( एलसी) साठी सादर करावयाच्या कागदपत्रांची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने येथील व्यापारी वर्गास कांद्याची निर्यात करणे अवघड होत आहे. परिणामी कांदा निर्यात मंदावली असून मागणी अभावी दिवसेंदिवस बाजारभावात घसरण होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ करून एक प्रकारे कांदा निर्यातीवर बंधने आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे शासनाच्या ध्येय धोरणाबाबत येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.कांदा बाजारभावात सतत घसरण सुरू राहिल्यास कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांकडून कांदा लिलावाचे कामकाज बंद पडून रस्ता रोको किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे. तरी कांदा बजाजरभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने कांदा निर्यातीवरील सर्व बंधने (किमान निर्यात मूल्य - एमइपी, लेटर ऑफ क्रेडिटची अट ) इत्यादी तात्काळ उठवून कांदा निर्यातीस प्रोत्साहन देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे खेड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी समितीच्या वतीने केली आहे. सदर पत्राच्या प्रति पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह संबंधित खात्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :onionकांदा