शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडचे प्रसारक शरद पोखरकर मारहाण प्रकरणातील आरोपींना अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 18:10 IST

मंचर येथील संभाजी ब्रिगेडचे प्रसारक शरद पोखरकर यांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या सर्व गुंडांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

चाकण : मंचर येथील संभाजी ब्रिगेडचे प्रसारक शरद पोखरकर यांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या सर्व गुंडांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 'शिवजयंती' संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात जल्लोषात साजरी झाली. तसेच शिवजयंतीच्या आनंदाला गालबोट लागेल अशा प्रकारची एक घटना मंचर या ठिकाणी घडली.शरद पोखरकर हे संभाजी ब्रिगेडचे प्रसारक असल्याकारणाने तसेच शिवजयंती निमित्त शाळेतील मुलांचे प्रबोधन व्हावे म्हणून त्यांनी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप केले. याचा राग धरून बजरंग दलाच्या काही गुंडांनी शरद पोखरकर यांच्यावर त्यांचे घरात घुसून भ्याड हल्ला करून त्यांना खूप मारहाण केली आणि तू तुझे सामाजिक प्रबोधन थांबविले नाही, तर तुझा दाभोळकर आणि पानसरे करू अशी त्यांना त्यांचे कुटुंबासमोर धमकी दिली. तरी या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे व पुणे जिल्हा सचिव प्रमोद गोतारणे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना संबंधित गुन्हेगारांवर कारवाई होऊन झालेल्या प्रकारामध्ये शासनाने लक्ष घालावे याबाबत निवेदन दिले.तसेच हे गुंड जातीयवादी समाजविघातक भाषा बोलत असल्याने या गुंडांचा गोविंद पानसरे यांच्या खुनात हात असण्याची शक्यता असल्याचा संशय येत असल्याने या समाजकंटकांना वेळीच अटक करून त्यांची कसून चौकशी करावी, म्हणजे खरे ते सत्य समोर येईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे व पुणे जिल्हा सचिव प्रमोद गोतारणे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याजवळ व्यक्त केले. तसेच चर्चा करत असताना संबंधित गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात आम्ही दखल घेऊ अशी जिल्हाधिकारी यांनी ग्वाही दिली. पोलीस अधीक्षक पुणे यांना देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊस संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव प्रमोद गोतारणे, पिं.ची.शहर अध्यक्ष प्रविण कदम, शहर कार्याध्यक्ष सतीश काळे, भो.श. अध्यक्ष सुधीर पुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे