पालिकेच्या संगणक प्रशिक्षण योजनेचा बोजवारा

By Admin | Updated: January 17, 2015 00:09 IST2015-01-17T00:09:21+5:302015-01-17T00:09:21+5:30

झोपडपट्ट्यांमधील मुलांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली.

Deletion of Municipal Corporation's Computer Training Scheme | पालिकेच्या संगणक प्रशिक्षण योजनेचा बोजवारा

पालिकेच्या संगणक प्रशिक्षण योजनेचा बोजवारा

दीपक जाधव, पुणे
झोपडपट्ट्यांमधील मुलांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली. त्याकरिता ९३ लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशा संगणक प्रयोगशाळा असलेल्या ६ बसची खरेदी करण्यात आली. मात्र, एका बसचा अपवाद वगळता उर्वरित ५ बस व्हेईकल डेपोमध्ये धूळ खात पडून आहेत.
संगणकाच्या जोरावर तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संगणक प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज बनली आहे, या पार्श्वभूमीवर अल्प उत्पन्न गटांमधील, झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन संगणक प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली. त्याकरिता संगणक, फर्निचर इत्यादींनी सुसज्ज असलेल्या ६ बसची २००८-०९ मध्ये खरेदी करण्यात आली. त्याकरिता ९३ लाख ७७ हजार रुपये खर्च करण्यात आले.
नागरवस्ती विकास योजना या विभागामार्फत ही योजना कार्यान्वित केली जाते. नगरसेवक, स्वयंसेवी संस्था यांना त्या बस चालविण्यास देण्यात आल्या. उपमहापौर आबा बागुल यांनी चालविण्यास घेतलेल्या बसचा अपवाद वगळता इतर सर्व बस गेल्या एक वर्षापासून व्हेईकल डेपोमध्ये धूळ खात पडल्या आहेत.
मोठा गाजावाजा करून महापालिकेकडून योजना सुरू केल्या जातात. मात्र, काही दिवसांनी त्या योजनेचा पूर्ण बोजवारा उडतो.
योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी याकडे आयुक्त कुणाल कुमार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी केली आहे.

Web Title: Deletion of Municipal Corporation's Computer Training Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.