भोर तालुक्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा
By Admin | Updated: August 21, 2014 23:47 IST2014-08-21T23:47:20+5:302014-08-21T23:47:20+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मिळणारे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले,

भोर तालुक्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा
भोर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मिळणारे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले, करारावर (तात्पुरते) नेमलेल्या डॉक्टरांना पगार नाही, डिङोलअभावी रुग्णवहिका बंद, औषध खरेदी होत नाही, सोनोग्राफी मशिनही बंद आणि तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. ही स्थिती आहे भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाची.
येथे आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे
रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णकल्याण समितीने निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
इतरांना आरोग्य सुविधा देणारे रुग्णालयच अत्यवस्थ होऊन सलाईनवर आले आहे.
लोकांना मोफत
आरोग्यसेवा मिळावी म्हणून शासनाने 2क्क्1/2 साली सुमारे दीड
कोटीची इमारत बांधून ग्रामीण आरोग्य केंद्राचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केले. 5क् खाटांची सोय करण्यात आली. रुग्णालयात चालकपद रिक्त, कक्ष सेवकपद, दोन सफाई कर्मचारीपद रिक्त, 7 डॉक्टरांची नेमणूक आहे, मात्र 4 पदे रिक्त असून, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. नेमणूक केलेले स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था आहे.
रुग्णकल्याण समितीने निधीबाबत वारंवार लेखी निवेदन देऊनही शासनाचे वरिष्ठ आधकारी दुर्लक्ष करीत असल्याचे रुग्णकल्याण समितीचे सदस्य सारंग शेटे व गजानन शेटे यांनी सांगितले.
या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था आरोग्य केंद्रासारखी झाली आहे. शासनाचा भोंगळ कारभारात सर्वसामान्य रुग्ण मात्र भरडतोय. याबाबत रुग्णालयाचे अधीक्षक राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. (वार्ताहर)
4मागील 8 महिने राष्ट्रीय ग्रमीण अभियानांतर्गत मिळणारे अनुदान न मिळाल्याने 11 महिन्यांच्या करारावर असणारे वैद्यकीय अधिकारी व शालेय आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांना 8 महिने पगार नाही.
4पगार नसल्याने चालक काम सोडण्याचा विचारात आहे. निधी नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात सफाई कर्मचारी कामावर घेता येत नसल्याने सर्वत्र घाणीचे सामाज्य निर्माण झाले आहे.
4सोनोग्राफी मशिन बंद असल्याने रुग्णांची तपासणी करता येत नाही. निधी नसल्याने दुकानातून औषधे खरेदी होत नाही. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात.