देहूत हरिभक्तीचा जागर
By Admin | Updated: March 14, 2017 07:53 IST2017-03-14T07:53:46+5:302017-03-14T07:53:46+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३६९ वा बीजोत्सव सोहळा मंगळवारी होत असून राज्यभरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी, फडकरी देहूनगरीत दाखल होत आहेत

देहूत हरिभक्तीचा जागर
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३६९ वा बीजोत्सव सोहळा मंगळवारी होत असून राज्यभरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी, फडकरी देहूनगरीत दाखल होत आहेत. श्री संत तुकाराममहाराज संस्थानसह शासकीय प्रशासन यंत्रणा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.
आठवडाभरापासून श्रीक्षेत्र देहूनगरीतील इंद्रायणी नदीकाठी, मोकळ्या शेतात राहुट्यामध्ये टाकून आणि विविध धर्मशाळेत अखंड हरिनामाचा जागर सुरू आहे. त्याची सांगता मंगळवारी होणार आहे. मात्र संस्थानचा बीजोत्सव सोहळ्याची सांगता २१ मार्च रोजी लळीत या पारंपरिक कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे यांनी दिली.
बीजोत्सवासाठी संस्थानच्या वतीने दर्शन बारी सुरू केली
असून मंदिर परिसरात मंडप घालण्यात आला आहे