भेंडी, मिरची, गवार, मटारच्या भावात घट

By Admin | Updated: October 26, 2015 02:00 IST2015-10-26T02:00:41+5:302015-10-26T02:00:41+5:30

मागील आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढल्याने बहुतेक फळभाज्यांच्या भावात घट झाली आहे.

Deficit of okra, chilli, guava, peas | भेंडी, मिरची, गवार, मटारच्या भावात घट

भेंडी, मिरची, गवार, मटारच्या भावात घट

पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढल्याने बहुतेक फळभाज्यांच्या भावात घट झाली आहे. प्रामुख्याने भेंडी, हिरवी मिरची, गवार, मटार, दोडका, कारली, फ्लॉवर, मटार या फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. पालेभाज्यांची आवक कमी असल्याने भाव तेजीत राहिले.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी सुमारे २०० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दसऱ्यामुळे गुरुवारी शेतमालाची फारशी तोडणी न झाल्याने शुक्रवारी बाजारात आवक कमी झाली होती. परिणामी रविवारी आवक वाढून मागणीही चांगली राहिली. रविवारी भेंडी, गवार, हिरवी मिरची, कारली, मटार या फळभाज्यांचे भाव प्रत्येकी दहा किलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरले. तर दोडका व फ्लॉवरच्या भावात अनुक्रमे ५० व २० रुपयांची घट झाली. शेवग्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांनी वाढले. इतर फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरच्या भावात शेकडा जुडीमागे रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांची, तर मुळा व कांदा पातच्या भावात सुमारे ४०० रुपयांची वाढ झाली. शेपू, मेथी, पालक, चवळई या भाज्यांचे भाव १०० ते २०० रुपयांनी उतरले.
रविवारी घाऊक बाजारात परराज्यातील कर्नाटक येथून ३ ते ४ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून सुमारे ३ हजार गोणी लसूण, आग्रा येथून ४० ते ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
स्थानिक भागातून ५०० ते ५५० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, २५ ते ३० टेम्पो फ्लॉवर, १८ ते २० टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरची, १५० ते १६० गोणी भुईमुग शेंग, ५० ते ६० गोणी मटार, १० ते १२ टेम्पो तांबडा भोपळा, नवीन कांदा ५० ट्रक, जुना कांदा ३ ते ४ ट्रक, तळेगावहून बटाटा सुमारे ६ हजार गोणी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : जुना ३००-४००, नवा : २५०-३५०, बटाटा : ९० - १२०, लसूण ५००- ९००, आले : सातारी ३५०, बंगलोर ३००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान २५०-३५०, सुरती २५०-३५०, टोमॅटो : १०० -१४०, दोडका : २५० -३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-१२०, चवळी २०० -२५०, काकडी : १५० -२००, कारली : हिरवी २०० -२२०, पांढरी १२०- १४०, पापडी : ३००-४००, पडवळ : १५० - १६०, फ्लॉवर : ५० - १००, कोबी : ४०-१००, वांगी : १५० -२००, डिंगरी : २०० - २५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : १८०-२००, तोंडली : कळी १६०-२००, जाड ९० -१००, शेवगा : ७००-७५०, गाजर : २५०-३००, वालवर : ३००-४००, बीट : ८० - १००, घेवडा : ३५०-४५०, कोहळा : १००-१५०, घोसावळे : १२० -१४०, ढेमसे : १६० -१८०, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार : स्थानिक ८००-९०००, पावटा : ४०० -५००, तांबडा भोपळा : ५०-१००, सुरण : २३०-२५०, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : ६०-१००.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ५००-८००, शेपू : ७००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५०० - ६००, करडई : ५००-६००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ५००-६००, मुळा : ५००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ४००-५००, चवळई: ४००- ५००, पालक:
५००-६००.

Web Title: Deficit of okra, chilli, guava, peas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.