सत्ताधाऱ्यांना हटवा : व्यंकय्या नायडू
By Admin | Updated: February 17, 2017 04:30 IST2017-02-17T04:30:20+5:302017-02-17T04:30:20+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यात सकाळ, दुपार व संध्याकाळ घोटाळयांच्या बातम्या वाचायला आणि ऐकायला मिळत होत्या. मात्र आता

सत्ताधाऱ्यांना हटवा : व्यंकय्या नायडू
पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यात सकाळ, दुपार व संध्याकाळ घोटाळयांच्या बातम्या वाचायला आणि ऐकायला मिळत होत्या. मात्र आता केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर खूप बदल घडला आहे. त्यामुळे महापालिकेतूनही काँग्रेस-राष्ट्रवादीला हटवून भाजपाचा महापौर निवडून द्या असे आवाहन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले.
घोरपडी येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यकंय्या नायडू यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. व्यंकय्या नायडू म्हणाले, नरेंद्र मोदींनी गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे, राज्याकडूनही त्यामध्ये आणखी सुट दिली जाईल. त्यानंतर अवघ्या एक टक्के व्याजदराने नागरिकांना गृहकर्ज मिळेल. नोटबंदी करण्यात आली नव्हती तर नोट बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)