पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:10 IST2021-05-11T04:10:31+5:302021-05-11T04:10:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरीत्या मॉर्फ करून ...

Defamation by morphing photos of Prime Minister Modi, Chief Minister Yogi | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरीत्या मॉर्फ करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव मोहसीन ए. शेख आणि स्वाभिमानी लोहार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी भाजपा सोशल मीडियाचे पुणे शहर संयोजक विनीत वाजपेयी (वय ३८, रा. साठेवस्ती, लोहगाव) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जावीर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांचे मॉर्फ केलेले फोटो वापरून देशाच्या पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य जाणूनबुजून करून त्यांची बदनामी केली आहे. सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Defamation by morphing photos of Prime Minister Modi, Chief Minister Yogi