मृग कोरडा; पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 23, 2014 22:11 IST2014-06-23T22:11:45+5:302014-06-23T22:11:45+5:30
मृग संपून आद्र्र नक्षत्र सुरू झाले असले, तरीसुद्धा वरुणराजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

मृग कोरडा; पावसाची प्रतीक्षा
>शेलपिंपळगाव : मृग संपून आद्र्र नक्षत्र सुरू झाले असले, तरीसुद्धा वरुणराजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या वर्षी मॉन्सूनच्या पावसाची शेतक:यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
मृग नक्षत्रत झालेल्या पिकांच्या पेरण्या वाढीच्या, तसेच उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर असल्याने बळीराजा याच नक्षत्रत पिकांच्या पेरणीला प्रधान्य देत असतो. विशेषत: भुईमूग, बाजरी, मूग, कडधान्य, पालेभाज्या या पिकांची मोठय़ा प्रमाणात पेरणी खरिपात केली जाते. पेरणीपूर्व शेतीची मशागत करून, तसेच जमिनीला खतावणी टाकून शेती पेरणीयोग्य करण्यात आलेली आहे. मात्र, मॉन्सून बरसण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे. पावसाळी हंगामाची सुरुवात ही शेती हंगामाची सुरुवात असते.
या वर्षीच्या शेती हंगामी वर्षाला 7 जूनपासून सुरुवात झाली. मृग नक्षत्र प्रारंभी येत असल्याने या नक्षत्रत हमखास पावसाची हमी शेतकरी बाळगत असतो. त्यादृष्टीने शेतकरी उन्हाळी हंगामाच्या समाप्तीपासून जमिनीच्या मेहनतीच्या कामांची हाताळणी करून जमिनीला पिकांच्या उगवणीसाठी सर्वतोपरी पोषक बनवून ठेवतो. या वर्षी पावसापूर्वी मशागतीच्या कामांवर अखेरचा हात फिरवलेला असलेल्या पेरणीची कामे सोपी झालेली होती. पाऊस न पडल्याने पेरणीची गणिते
चुकीचे ठरले.
4खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील महिन्यात अवकाळी पावसाची कृपा झाली होती. अवकाळी पाऊस वगळता हंगामी पावसाची अजिबातच कृपा न झाल्याने सुमारे 45 ते 5क् गावांतील खरिपाच्या पेरण्यांना विलंब होत आहे. सन 2क्12नंतर पुन्हा या वर्षी अशी परिस्थिती ओढवलेली आहे.
4चालू वर्षी पावसाने दिलेली ओढ पुढील हंगामासाठी धोकादायक ठरणार आहे. पूर्ण क्षमतेने पाऊस झाल्यानंतर पाण्याच्या स्नेतांची पाणीपातळी चांगली वाढली जाते. अद्यापही वरुणराजा बरसला नसल्याने विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट असलेली दिसून येते.