'...म्हणून लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी नरेंद्र मोदींची निवड केली'; दीपक टिळकांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 01:51 PM2023-08-01T13:51:08+5:302023-08-01T13:52:52+5:30

आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. या सर्व महान विभुतींना मी नमन करतो, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 

Deepak Tilak told the reason why he chose PM Narendra Modi for the Lokmanya Tilak Award | '...म्हणून लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी नरेंद्र मोदींची निवड केली'; दीपक टिळकांचं स्पष्टीकरण

'...म्हणून लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी नरेंद्र मोदींची निवड केली'; दीपक टिळकांचं स्पष्टीकरण

googlenewsNext

लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक दिलेल्या महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी प्रणाम देतो, असे मराठीत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची मने जिंकली. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक आदी उपस्थित होते. 

मी इथे येऊन खूप भावूक झालो आहे. भारताचे गौरव आणि आदर्श लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तसेच आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. लोकमान्य हे आपल्या देशाचे तिलक आहेत. तसेच अण्णाभाऊ यांचे योगदान खूप मोलाचे आहे. दोन्ही व्यक्तींना मी नमन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आज पुण्याच्या पावनभुमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ही पुण्यभूमी शिवरायांची धरती आहे. या धरतीवर ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे. त्या भुमीवर मी आज आलो आहे. आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. या सर्व महान विभुतींना मी नमन करतो, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 

Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट'

आज मला मिळालेला सन्मान अविस्मरणीय अनुभव आहे. जी संस्था थेट लोकमान्य टिळक यांच्याशी जोडलेली आहे. त्या संस्थेकडून सन्मान मिळणं हे माझ्या भाग्याचे आहे. आपल्या देशात काशी आणि पुणे इथे विद्वत्ता चिरंजीव आहे. पुण्यनगरी सन्मान हा माझा गौरव आहे. जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी देखील वाढते. आज टिळक यांचे नाव जोडलेला पुरस्कार मला मिळाला आहे. हा सन्मान मी देशवाशीयांना अर्पण करतो. देशाच्या सेवेसाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे, तो पुरस्कार मिळणं गौरवशाली आहे. या पुरस्काराची रक्कम मी गंगेसाठी अर्पण करतो, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास काही जणांनी विरोध दर्शवला होता. तसेच विविध प्रश्न देखील उपस्थित केले होते. आज पुरस्कार नरेंद्र मोदींना का देण्यात येतोय, याबाबतची माहिती लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी प्रस्तावात नमूद केली. लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले. राष्ट्रीयत्व, पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितले होते. ते सूत्र नरेंद्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्रात आम्हाला दिसले. त्यातच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण त्यांच्या कार्यक्रमात आढळतात. म्हणूनच आम्ही सर्वांनी नरेंद्र मोदी यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचं दीपक टिळक यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: Deepak Tilak told the reason why he chose PM Narendra Modi for the Lokmanya Tilak Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.