आळंदीत जीवनदायी रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:55+5:302021-02-08T04:09:55+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीत नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते 'जीवनदायी' रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत कुर्हाडे, नगरसेवक सचिन गिलबिले, ...

आळंदीत जीवनदायी रुग्णवाहिकेचे लोकार्पण
तीर्थक्षेत्र आळंदीत नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते 'जीवनदायी' रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत कुर्हाडे, नगरसेवक सचिन गिलबिले, संतोष लोणारी, गिरीश काटे, सूरज दाभाडे, किरण काळे, विक्रम लोणार आदिंसह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्षा उमरगेकर म्हणाल्या की, नगरसेवक सचिन गिलबिले हे सेवाभावी कार्यकर्ते असून आळंदी शहराच्या विकासासाठी ते नेहमीच आग्रही असतात. त्यात भर म्हणून त्यांच्या सोशल फाउंडेशनने तसेच सहकाऱ्यांनी स्थानिक तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून मोठे सेवा कार्य केले आहे. या सेवेत सातत्य हवे तसेच गरजूंना रुग्णवाहिका अत्यावश्यक वेळी उपलब्ध होईल याची काळजी घेणे. आभार नगरसेवक सचिन गिलबिले यांनी मानले.
०७ शेलपिपंळगाव १
आळंदीत जीवनदायी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना मान्यवर.