भरणे यांच्या निधीतून कार्डियाक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST2021-06-29T04:08:17+5:302021-06-29T04:08:17+5:30
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या २०२१ - २२ या वर्षीच्या स्थानिक विकास निधीतून इंदापूर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर ...

भरणे यांच्या निधीतून कार्डियाक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या २०२१ - २२ या वर्षीच्या स्थानिक विकास निधीतून इंदापूर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर व इंदापूर तालुक्यासाठी देण्यात आलेल्या कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात रविवार (दि. २७) रोजी कार्डियाक ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक तालुकाध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, युवा उद्योजक संजय दोशी, सचिन खामगळ, नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्निल राऊत व शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांचे, रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आधुनिक सुविधा असलेल्या दोन रुग्णवाहिका राज्यमंत्री भरणे यांनी उपलब्ध करून दिल्याने व दिलेला शब्द पाळल्याने नागरिकांनी राज्यमंत्री भरणे यांचे आभार मानले आहेत.
ऑक्सिजन जनरेट प्रकल्पाचे उद्घाटन
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रयत्नांतून टाटा सीएसआर फंडाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन जनरेट प्रकल्पाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पातून दिवसाला जवळपास ३० जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, यामुळे ऑक्सिजनवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाची बचत होणार आहे. त्याचबरोबर रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व मान्यवर.