पावसाने हटवली दौंडची टंचाई।
By Admin | Updated: August 25, 2014 05:21 IST2014-08-25T05:21:39+5:302014-08-25T05:21:39+5:30
पावसाळा संपत आला तरी दौंडकडे दुर्लक्ष केलेल्या पावसाने येथील टंचाई मिटवली. गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस पडत आहे. आजही दिवसभर रिमझीम पाऊस झाला

पावसाने हटवली दौंडची टंचाई।
दौंड: पावसाळा संपत आला तरी दौंडकडे दुर्लक्ष केलेल्या पावसाने येथील टंचाई मिटवली. गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस पडत आहे. आजही दिवसभर रिमझीम पाऊस झाला. यामुळे काही वेळ विद्यत पुरवठा खंडीत झाला होता.
खोर (ता. दौंड) परिसरातील नारायण बेट, देऊळगावगाडा, माळवाडी, पडवी, कुसेगाव परिसरात शनिवारी झालेल्यापावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाने ओढे, नाले, तलावाला पाणी आले आहे. खोर पसिरामधील असलेला डोंबेवाडी पाझर तलाव हा (दि. २३) रोजी झालेल्या पावसाने भरला गेला आहे.
जून मधील पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या गेल्या. खरीपाचा हंगाम पावसाअभावी वाया गेला. मात्र या पावसाने शेतकरी वर्ग शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे.
शेतकरी ज्वारी, हरभरा, कांदा, गहू तसेच कडधान्याचे पीक घेण्याच्या तयारीला सुरुवात करणार असल्याचे चित्र आहे. खोर मधील असलेल्या डोंबेवाडी, हरिबाचीवाडी, पाटलाचीवाडी, पिंपळाचीवाडी, कुदळेवस्ती मधील असलेल्या डाळींब, अंजीराच्या फळबांगाना दिलासा मिळाला आहे. खरिप हंगाम वाया गेल्याने रब्बी हंगाम तरी चांगल्या प्रकारे येईल अशी अपेक्षा या भागामधील शेतकरी वर्गाची आहे. (वार्ताहर)