कांदा, मटारच्या भावात घट

By Admin | Updated: January 9, 2017 02:20 IST2017-01-09T02:19:29+5:302017-01-09T02:20:14+5:30

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी कांदा, बटाटा, आले या फळभाज्यांच्या भावात घट झाली. तर वांगी, फ्लॉवरचे भाव काहीप्रमाणात वाढले.

Decrease in the price of onion, peas | कांदा, मटारच्या भावात घट

कांदा, मटारच्या भावात घट

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी कांदा, बटाटा, आले या फळभाज्यांच्या भावात घट झाली. तर वांगी, फ्लॉवरचे भाव काहीप्रमाणात वाढले. इतर फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले.
रविवारी बाजारात १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. कांद्याची आवक जवळपास २०० ट्रक आवक झाल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत १० किलोमागे २० रुपयांची घट झाली. कांद्याला ६० ते ८० रुपये भाव मिळाला. बटाट्याची आवकही सुमारे ९० ट्रक झाल्याने भाव उतरले आहेत. बाजारात मध्य प्रदेशातून मटारची तब्बल ३० ते ३२ ट्रक आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत रविवारी झालेली आवक मोठी होती. स्थानिक भागातूनही ३०० ते ३५० गोणी आवक झाली. त्यामुळे भावात पुन्हा घट झाली. हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, गाजराची आवकही चांगली होत आहे. मागणीच्या तुलनेत माफक आवक असल्याने भाव स्थिर राहिले. टोमॅटोची आवक ५.५ ते ६ हजार पेटी झाली. आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने टोमॅटोचे भाव दहा किलोमागे ४० ते ६० रुपयांपर्यंत स्थिरावले.

तांदूळ, साबुदाणा तेजीत

भुसार बाजारात आवक कमी होत असल्याने तांदूळ, साबुदाणा, नारळाच्या भावात वाढ झाली. तूरडाळीसह हरभराडाळीचे भावही उतरले आहेत. भाजकी डाळ व बेसनाच्या भावातही घट झाली. मार्केट यार्डातील भुसार बाजारात कोलम व आंबेमोहोर तांदळाच्या भावात काहीशी तेजी आहे. नोटाबंदीमुळे वाहतूक खचार्मुळे तांदळाची आवक होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

लिंबू, डाळिंबाची भाववाढ : फळांचे भाव स्थिर
फळबाजारात आवक कमी झाल्याने लिंबु व डाळिंबाच्या भावात वाढ झाली. उत्पादन क्षेत्रातच लिंबाची खरेदी वाढल्याने रविवारी बाजारात सुमारे ५ हजार गोणी आवक झाली. त्यामुळे भाव ४० ते ५० टक्क्यांनी वाढले. लिंबाला गोणीमागे ६० ते १६० रुपये भाव मिळाला. डाळिंबाची आवक २५ ते ३० टन झाल्याने भावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. तर द्राक्षाची आवक वाढल्याने भावात २० ते २५ टक्के घट झाली. थंडीमुळे कलिंगड, खरबुजाची आवक कमी झाली. इतर फळांचे भाव स्थिर राहिले.

रशियातील सफरचंद पुण्यात
४पुणे : रशियातून रॉयल गाळा, रॉयल मस्ट, रेड चीफ या सफरचंदाची पुण्यातील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. या सफरचंदाचा दर्जा चांगला, चवीला गोड असल्याने मागणी आहे.
४मार्केट यार्डातील फळबाजारात यंदा पहिल्यांदाच रशियन सफरचंदाची आवक वाढली आहे. रविवारी या हंगामात पहिल्यांदाच १५० बॉक्सची आवक झाली.
४२२ किलोच्या बॉक्सला १८०० ते २२०० रुपये भाव मिळाला. पुढील तीन महिने या सफरचंदाची आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापारी कुणाल काची यांनी दिली.

फुलांना मागणी कमी
फुलबाजारात बहुतेक फुलांची आवक कमी झाली आहे. सजावटीच्या फुलांची मागणी कमी झाल्याने भावात घट झाली. रविवारी बाजारात झेंडूला प्रतिकिलो २० ते ३० रुपये व गुलाबाला २० नगांमागे २० ते ६० रुपये भाव मिळाला. जर्बेरा व कॉर्नेशियनच्या भावातही मोठी घट झाली.

Web Title: Decrease in the price of onion, peas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.