शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

धरणांच्या पातळीत होतेय घट, उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:20 IST

जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे.

शेटफळगढे - जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे.पुणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात छोटी-मोठी तब्बल २५ धरणे आहेत. ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. जिल्ह्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरू आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यातआली आहेत, तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे, पाणी साठवणक्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्रम राबविले जातात.धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. पारा ३५ अंशांच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकणार असल्याची चिन्हे गडद झाली आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होणार यात शंकाच नाही. खडकवासल्यावर पुणे शहर व ग्रामीण भागातील पाणी योजना आणि हजारो एकर शेती अवलंबून आहे.उजनी धरण हे सोलापूर, पुणे, नगर या तिन्हींसाठी वरदान ठरले असल्यामुळे या धरणातील पाण्यावरून कायमच रणकंदन होत असते. यंदा हे धरण ओसंडून वाहिले. पुणे ग्रामीण भागातील शेतकºयांच्या हक्काच्या पाण्यावर सोलापूरकरांनी डल्ला मारल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हक्काचे पाणी सोलापूरला जाण्यापासून रोखले होते.प्रमुख धरणांतील पाणीसाठापिंपळगाव जोगे : ४२.६४माणिकडोह : ४७.७९येडगाव : ५७.९४डिंभे : ५६.२३घोड : ४१.१५कळमोडी : ९८.०७चासकमान : ४८.६७भामा-आसखेड : ७३.२०पवना : ५५.०७मुळशी : ४३.२३टेमघर : ०.०पानशेत : ६६.१४खडकवासला : ८१.४३गुंजवणी : ३८.८६नीरा-देवघर : ५१.७९भाटघर : ६९.५६वीर : ६०.४२नाझरे : ३५.०२उजनी : ७३.१९1 खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या इंदापूर दौंड हवेलीसह बारामतीच्या काही गावची शेती गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आली आहे. यंदा तरी शेतीला पाणी येईल, या आशेवर या तालुक्यातील शेतकरी आहेत.2मात्र उन्हाळ्यात शेतीला पाणी किती देणार, हे सध्या तरी अस्पष्ट आहे. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि किती सोडले पाहिजे, याचे नियोजन हवे. पाऊस यंदा होऊनदेखील शेतीला पाणी नाही, अशी वेळ शेतकºयांवर येऊ नये. यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेWaterपाणी