शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत माती विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून इंदापुरात फसवले, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:53 IST

भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद

इंदापूर : भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. महंमद कमल अन्सारी (रा. बॉम्बे फर्निसिंग बिल्डिंग, कोणार्णनगर, विमाननगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी अर्जुन पठारे (वय ५०, रा.गलांडवाडी नं. १, ता.  इंदापूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारे यांचा मुलगा पुण्यातील वाघोली येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याची महंमद अन्सारीसोबत ओळख झाली. आरोपीने त्याला वेळोवेळी फोन करुन तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन भागीदारीमध्ये शेतकऱ्यांची एक एकर जमीन घ्यायची आहे का अशी विचारणा केली. या जमिनीतील माती दुबईला विकायची असे सांगून त्याने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याकरिता आईवडिलांकडून दहा लाख रुपये आणायला सांगितले. पठारे यांच्या मुलाने पुण्यातील लष्कर भागातील लकी हॉटेलमध्ये पठारेंशी अन्सारीची भेट घालून दिली. आरोपीने त्यांना दुबईमध्ये माती विक ण्याच्या व्यवसायाची माहिती देऊन पैशांची मागणी केली. पठारे यांनी त्याला दोन हप्त्यांमध्ये पैसे देण्याचे मान्य केले. ३ मे २०१७ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर शाखेमध्ये जाऊन पठारे यांनी पत्नीच्या खात्यावरुन अन्सारीच्या विमाननगर शाखेच्या खात्यावर आरटीजीएसने २ लाख ३२ हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर १० हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर अन्सारीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. व्यवसाय देखील चालु केला नाही. भेट घेणे टाळले. फियार्दीने मोबाईलवरुन वेळोवेळी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करून फियार्दीस जीवे मारण्याची धमकी दिली. आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे