राजकीय संस्कार संपतात तेव्हा सार्वजनिक नीतिमूल्यांचा ऱ्हास : पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:12+5:302021-02-05T05:04:12+5:30
'भूमी फाऊंडेशन'च्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या ...

राजकीय संस्कार संपतात तेव्हा सार्वजनिक नीतिमूल्यांचा ऱ्हास : पोपटराव पवार
'भूमी फाऊंडेशन'च्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बाभूळसर खुर्दचे (ता. शिरूर) माजी सरपंच दशरथ फंड यांना राज्यस्तरीय ' सामाजिक युवा संघटन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले की, ‘जोपर्यंत या देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमता नष्ट होत नाही, तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा आपणास लाभला. हे विचारच आपणास समानतेकडे नेऊ शकतील." या वेळी पद्मश्री पोपटराव पवार, संस्थेचे अध्यक्ष प्रा. कैलास पवार, पोलीस निरीक्षक प्रतापराव मानकर, प्रकल्पप्रमुख सुरेश साळुंके, डॉ. किशोर देसरडा यांसह अनेक मान्यवर उपास्थित होते.
भूमी फाऊंडेशनच्या वतीने दशरथ फंड यांना 'राज्यस्तरीय सामाजिक युवा संगठन ' पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.