शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:09 IST

जिल्ह्यात या वर्षी १९७२ साली पडलेल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. आतापासून पाणी वापरताना काटकसर करणे गरजेचे आहे.

पुणे : जिल्ह्यात या वर्षी १९७२ साली पडलेल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. आतापासून पाणी वापरताना काटकसर करणे गरजेचे आहे. यामुळे शासनाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, तसेच टंचाई आराखड्यांच्या कामांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली. कालवा समितीच्या बैठकीत सध्या दोन आवर्तने आणि उन्हाळ्यात १ आवर्तन देण्यास अनुकूलता दर्शविली आहे, असे असले तरी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनासारख्या पाणी वाचवणाºया योजना राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांत पाण्याची भीषण परिस्थिती आहे. आवर्तनावरच येथील पाणी पुरवठा अवलंबून असतो. शासनाने जिल्ह्यातील केवळ १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण १३ तालुक्यात पाण्याची भीषण स्थिती आहे. नद्या, तसेच पाण्याचे अनेक उद्भव आतापासूनच कोरडे पडू लागले आहे. यामुळे उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती राहणार आहे. अशा स्थितीतही पाण्याचे आवर्तन मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.नुकत्याच मुंबई येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंसाधन आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सध्य स्थितीत दोन आवर्तने आणि उन्हाळ्यात तीन आवर्तने देण्याचे मान्य केले आहे. असे असले तरी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकºयांनी पिण्याच्या पाण्याला जास्त प्राधान्य द्यावे.पाण्याचा काटकसरीने वापर करावा. यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन वापरावे जेणे करून पाण्याची बचत होईल.>दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय बैठकाजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता लवकरच तालुकानिहाय बैठका घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत गावातील पाण्याचा आढावा घेऊन काय नियोजन करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गेल्या वर्षी टंचाईची अनेक कामे झालीत मात्र, त्यांची बिले अद्यापही मिळालेली नाहीत. यामुळे शासनाने ही बिले त्वरित द्यावी. या बरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्याला आणखी निधी द्यावा, अशी मागणीही देवकाते यांनी केली.>उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आताच ही स्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर दुष्काळनिवारणासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. येणाºया परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.-विश्वास देवकाते,अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :droughtदुष्काळ