एकजुटीने काम करण्याचा निर्णय
By Admin | Updated: November 24, 2014 00:28 IST2014-11-24T00:28:41+5:302014-11-24T00:28:41+5:30
विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अपयश आले. या संदर्भात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली

एकजुटीने काम करण्याचा निर्णय
पिंपरी : विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अपयश आले. या संदर्भात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली. या वेळी पराभवाने खचून जाऊ नये, आगामी महापालिका निवडणुकीत अधिकाधिक ताकत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, एकजुटीने काम करावे, असे मनोगत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले. महापालिका निवडणुकीची तयारीही करण्यात आली. एकजूट करण्यात आली.
खराळवाडीतील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीस पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शहर सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, अमर साबळे, प्रदेश महिला
आघाडी सरचिटणीस उमा खापरे, राजेश पिल्ले, अमोल थोरात,
अनुप मोरे, संजय मंगोडेकर, युवा
मोर्चा प्रदेश सरचिटणीस वीणा सोनवलकर, अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, महिला आघाडी शहराध्यक्षा
शैला मुळुक, अमित गोरखे आदी उपस्थित होते.
या वेळी महेश कुलकर्णी म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे. पिंपरीत झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आगामी महापालिका निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. परिवर्तनासाठी एकजुटीने काम करावे, योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात.’’
दुर्गे यांनी आगामी निवडणुकीत कोणत्या प्रकारे नियोजनाची माहिती दिली. या मतदारसंघांचे सहा विभाग निर्माण करून वेगवेगळ्या बैठकांचेही नियोजन केले गेले. (प्रतिनिधी)