पॉझिटिव्हिटी रेट पाहूनच इंदापूर अनलॉकचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:33+5:302021-06-09T04:13:33+5:30
इंदापूर: तालुक्यातील बाधितांची संख्या घटू लागली, तरी संकट कायम आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पाहूनच अनलॉक करण्याचा निर्णय येत्या ...

पॉझिटिव्हिटी रेट पाहूनच इंदापूर अनलॉकचा निर्णय
इंदापूर: तालुक्यातील बाधितांची संख्या घटू लागली, तरी संकट कायम आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पाहूनच अनलॉक करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल, असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
इंदापूर तालुका कोरोना नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकटे पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळसाहेब ढवळे, ॲड.राहुल मखरे, मुख्याधिकारी रामराजे कापरे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, शहरामधील रुग्णसंख्या आटोक्यात आली असली, तरी तालुक्यात बाधित रुग्ण अधिक आहेत. सध्याची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय करून इंदापूर शहर खुले करण्यासाठी दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क राहून ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सरसकट दुकाने चालू करण्यास परवानगी द्या : अंकिता शहा
इंदापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नगण्य असल्यामुळे सरसकट बाजारपेठ खुली करण्यास शासनाने परवानगी द्यावी. त्यासाठी राज्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आढावा बैठकीत केली. इंदापूर शहराला गॅस शवदाहिनी मंजूर केल्याबद्दल शहा यांनी भरणे यांचे आभार मानत इंदापूर नगरपरिषदेला कचरा डेपोच्या ठिकाणी बायो सी.एन.जी.प्रकल्पास मंजुरी मिळावी अशी मागणी केली.
०७ इंदापूर
इंदापूर येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.