शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कारवाई रद्दसाठी संघटना सक्रिय, तुकाराम मुंढे यांनी घेतलेले पीएमपीबाबतचे निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:24 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी, कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. आस्थापना आराखडा, शेकडो कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन, बदल्या, रजा अशा विविध निर्णयांवर संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी, कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. आस्थापना आराखडा, शेकडो कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन, बदल्या, रजा अशा विविध निर्णयांवर संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता काही निर्णय व कारवाई बेकायदेशीर असल्याचे नवीन अध्यक्षांना पटवून देत, ते रद्द करण्यासाठी संघटना सक्रिय झाल्या आहेत.मुंढे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर, कर्मचाºयांमध्ये शिस्त आणण्यासाठी कारवाइचा धडाका सुरू केला. सातत्याने गैरहजर राहणे, पूर्वपरवानगीने घेणाºया शेकडो कर्मचाºयांचे निलंबन, बडतर्फ करण्यात आले. सध्या दीडशेहून अधिक रोजंदारी वाहकांची, तर ३५० हून अधिक कायम सेवेतील कर्मचाºयांची गैरहजेरीबाबत चौकशी सुरू आहे. अंध व अपंग कर्मचाºयांची सेवाही समाप्त करण्यात आली. काही अधिकाºयांवरही मुंढे यांनी कारवाई केली. काहींच्या पदोन्नत्या रद्द केल्या. यातील काही निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे.आराखड्यामध्ये पदे व वेतनश्रेणी कमी करणे, बदल्यांमुळे अनेक कर्मचाºयांना नाहक त्रास, एक रजा; तसेच ससूनच्या प्रमाणपत्राच्या आग्रहावरही संघटना; तसेच संबंधित कर्मचारी संतप्त झाले होते. त्यामुळेच मुंढे यांच्या बदलीनंतर संघटनांनी आनंद व्यक्त करीत मुंढे यांचा निषेधही केला. आता मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय कर्मचाºयांवर अन्याय करणारे आणि बेकायदेशीर असल्याने ते बदलण्यासाठी संघटनांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे संघटनांच्या पदाधिकाºयांनी सांगितले.निर्णयांवर संघटनांची नाराजीदहा वर्षे रखडलेला आस्थापना आराखडा नव्याने तयार करून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. सेवा-शर्ती, पदभरती, पात्रता, पदोन्नती, वेतनश्रेणी हे निश्चित केले. प्रशासकीय कारण देत हजारो कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय घेतला; तसेच वैद्यकीय रजेसाठी केवळ ससून रुग्णालयातील प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. या सर्वच निर्णयांवर संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.सेवा समाप्त करण्यात आलेले कर्मचारी, रजेचा निर्णय, वैद्यकीय प्रमाणपत्र याबाबत नवीन अध्यक्षांकडे पाठपुरावा केला जाईल. हे निर्णय चुकीचे असल्याचे त्यांना पटवून देऊ. बेकायदेशीर बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देत, ते निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले; पण कर्मचाºयांवर मात्र अन्याय केला.- सुनील नलावडे,सरचिटणीस, पीएमपी राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनतुकाराम मुंंढे यांनी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांवर नवीन अध्यक्षांकडे निश्चितपणे दाद मागितली जाणार आहे. संबंधित निर्णयांवर कायदेशीर बाजू तपासून जे चुकीचे निर्णय आहेत ते रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. कर्मचारी-अधिकाºयांची चौकशी न करता कारवाई करण्यात आली. कामचुकारांवर कारवाईला आमचा विरोध नाही; पण त्यांच्यासोबत इतर प्रामाणिक कर्मचाºयांवरही कारवाई करण्यात आली. हे बेकायदेशीर असल्याने त्याकडे लक्ष वेधले जाईल.- राजेंद्र खराडे, अध्यक्ष,पीएमटी कामगार संघ (इंटक)

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे