ग्रामपंचायत न लढण्याचा निर्णय

By Admin | Updated: May 9, 2017 04:00 IST2017-05-09T04:00:31+5:302017-05-09T04:00:31+5:30

लोहगावतील सर्व राजकीय मंडळींनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याची निर्णय घेतला. उच्च न्यायालयाच्या

Decision not to fight the Gram Panchayat | ग्रामपंचायत न लढण्याचा निर्णय

ग्रामपंचायत न लढण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : लोहगावतील सर्व राजकीय मंडळींनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याची निर्णय घेतला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेत नव्याने ३४ गावे समाविष्ट करण्यात येणार असून त्यांमध्ये लोहागावचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार जगदीश मुळीक यांनी त्यांच्या रामवाडीतील कार्यालयात घेतलेल्या लोहगावकारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रताप खांदवे, पांडुरंग खेसे, राजेंद्र खांदवे, प्रीतम खांदवे, बंडूशेठ खांदवे, संतोष खांदवे, अशोक खांदवे, सोमनाथ खांदवे, सुनील खांदवे-पाटील, शांताराम खांदवे, देविदास खांदवे, सोमनाथ निंबाळकर, बाळासाहेब खांदवे, हनुमंत खांदवे, रावसाहे राखपसरे, संदीप मोझे, रामभाऊ खांदवे, पंडित निंबाळकर, प्रमोद काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Decision not to fight the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.