डीपीतील घोटाळ््याविषयी आरोपाऐवजी निर्णय घ्या!
By Admin | Updated: July 4, 2015 00:30 IST2015-07-04T00:30:27+5:302015-07-04T00:30:27+5:30
महापालिकेचा प्रारुप विकास आराखडा(डीपी) घोटाळ््याचे आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो ताब्यात घेतला. मात्र, केवळ घोटाळ््याचे आरोप करून चालणार नाही.

डीपीतील घोटाळ््याविषयी आरोपाऐवजी निर्णय घ्या!
पुणे : महापालिकेचा प्रारुप विकास आराखडा(डीपी) घोटाळ््याचे आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो ताब्यात घेतला. मात्र, केवळ घोटाळ््याचे आरोप करून चालणार नाही. या खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून, त्यांनी चुकीच्या गोष्टी दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यावा, अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
ठाणे महापालिकेनंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी शरद पवार यांनी थेट संवाद आज साधला. त्यावेळी शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, आमदार अॅड. जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवकांने वॉर्डातील प्रगती व अडचणीविषयी माहिती दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘‘विकास आराखडा शासनाच्या कोर्टात आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पुण्याचा मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दिल्लीत बैठक घेवून प्रयत्न करण्यात येणार आहेत. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजकांची मदत घेण्यात यावी. तसेच, केवळ एकाच भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याऐवजी शहराच्या सर्व दिशेला उभारण्यात यावेत. पाऊस लांबणीवर पडल्यास आवश्यक उपायोजनांसाठी पाटबंधारे विभागाशी महापालिका पदाधिका-यांनी चर्चा करून मार्ग काढावा. एलबीटी रद्दचा निर्ण़याचे परिणाम काय होतात. त्याचे निष्कर्ष पाहून त्यावर भाष्य करण्यात येईल. महापालिकेतील नगरसेवकांच्या कामकाजाचा आणखी तीन महिन्यांनंतर आढावा घेण्यात येईल.’’
मेट्रोची अधिवेशनावेळी दिल्लीत बैठक...
शहरातील मेट्रो प्रकल्पाविषयी यापूर्वीच्या सरकारकडेही पाठपुरावा केला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेण्यात येईल. त्यासाठी महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सर्वपक्षीय गटनेते, तसेच प्रशासनाचे अधिकारी येतील, असे पवार यांनी सांगितले. पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पाविषयी दुजाभाव केला जात आहे का ? असे विचारले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री रस्ते विकासमंत्री नागपूरचे आहेत. साहजिक आहे की, तळे राखी तो पाणी चाखी, अशी मराठीत म्हण आहे. मला अधिकार असते, तर पुण्याला झुकते माप मिळाले असते.’’
भ्रष्टाराचाराचे आरोप नको...
शिक्षण मंडळातील आजी-माजी अध्यक्षांवर शिक्षक बदलीप्रकरणात लाच घेतल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधितांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरील दोषारोप निश्चित झाल्यावर कडक कारवाई करण्यात येईल. परंतु, यापुढे कोणत्याही नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे सहन करणार नाही. महापालिकेच्या बांधकाम विभागातील फाईलीसाठी नगरसेवकांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. यापुढे कोणतीही तक्रार चालणार नाही, असा सज्जड इशारा शरद पवार यांनी बैठकीत दिला.
‘‘नगरसेवकांनी केवळ प्रभागात चांगली प्रगती करून चालणार नाही. संपूर्ण शहराच्या प्रश्नांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समविचारी काँग्रेस पक्षाला बरोबर घेवून कारभार
केली पाहिजे.’’
- शरद पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष,
राष्ट्रवादी.