अतिक्रमणाबाबत निर्णय लटकला
By Admin | Updated: August 21, 2015 02:37 IST2015-08-21T02:37:36+5:302015-08-21T02:37:36+5:30
या गावची ग्रामसभा अनेक मुद्द्यांवरून चांगलीच गाजली. गायरान जमीन, बंदिस्त गटारे, सार्वजनिक रस्ता या विषयांवरून ग्रामस्थांची एकमेकांमध्ये

अतिक्रमणाबाबत निर्णय लटकला
सोमेश्वरनगर : मुरूम (ता. बारामती) या गावची ग्रामसभा अनेक मुद्द्यांवरून चांगलीच गाजली. गायरान जमीन, बंदिस्त गटारे, सार्वजनिक रस्ता या विषयांवरून ग्रामस्थांची एकमेकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. विशेषत: मुरूम गावाच्या ५२ एकर गायरानावरील अतिक्रमणाबाबत कोणीच निर्णय घेत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येत उर्वरित गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा नवीन फंडा शोधला आहे.
नुकतीच मुरूम गावाची ग्रामसभा खंडाजंगी वातावरणात पार पडली. सार्वजनिक रस्ता, बंदिस्त गटारे, तंटामुक्ती अध्यक्ष निवड व गावाची गायरान जमीन याबाबत या सभेत
चर्चा झाली. तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले प्रकाश जगताप, हंबीरराव जगताप व दिनकर कदम यांची निवड अशा या गोंधळाच्या वातावरणामुळे झाली नाही. तर दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता व नीरा नदीवरील पूल अडवणुकीमुळे अजून अपूर्ण आहे.
या रस्त्यामुळे गावाचा विकास होणार असेल, तर त्याचे काम होऊ द्यावे, असे मत सोमेश्वरचे
माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी मांडले. यावर सोमेश्वरचे माजी संचालक पी. के. जगताप यांनी
मुरूम गावाला असलेल्या ६५ एकर गायरान जमिनीमधील ५० ते ५२ एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण झाले आहे.
आठ गटांपैकी ४ गटांची मोजणी होऊन हद्दी कायम झाल्या आहेत. अगोदर गायरान अतिक्रमण काढा, मी रस्त्याला अडचण येऊ देत नाही, असे स्पष्ट केले.
मुरूमच्या गायरानाची मोजणी होऊन हद्दी कायम होऊन सहा
महिने उलटले; मात्र याबाबत गावकारभारी कोणतेच ठोस पाऊल उचलत नाही. त्यामुळे मुरूमच्या ३०
ते ३५ युवकांनी एकत्र येत
गायरानाच्या अतिक्रमणाबाबत या गावपुढाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी उरलेल्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. आता
तरी हे गावपुढारी पुढे होऊन ५२
एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढतील, हा यामागील उद्देश आहे.
जर पुढाऱ्यांनी अतिक्रमण काढले नाही, तर चांगलेच आहे. या जमिनी आमच्याच होतील, अशी या युवकांची भूमिका आहे. (वार्ताहर)