गुळुंचेतील सदस्य मंडळ बरखास्तीच्या प्रकरणावर दोन महिन्यांत निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:14 IST2021-09-16T04:14:41+5:302021-09-16T04:14:41+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निगडे, कोळविहिरे गणाचे अध्यक्ष नितीन निगडे व स्वप्नील ...

गुळुंचेतील सदस्य मंडळ बरखास्तीच्या प्रकरणावर दोन महिन्यांत निर्णय घ्या
येथील ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निगडे, कोळविहिरे गणाचे अध्यक्ष नितीन निगडे व स्वप्नील जगताप यांनी ८ जानेवारी २०२० रोजी विभागीय आयुक्तांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्याची प्रथम चौकशी भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी केली. त्यानंतर विलंबाने अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेत सुनावणी होऊन त्याचा प्राथमिक अहवाल व निदेश मागणी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यासाठी जिल्हा परिषदेने आठ महिन्यांचा वेळ व्यतीत केला. तर, विभागीय आयुक्तांकडे गेल्या पाच महिन्यांपासून प्रस्ताव पेंडिंग असल्याने या कारभाराला कंटाळून अखेर नितीन निगडे यांनी महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त तसेच पुण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रतिवादी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांकडून प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. घनश्याम जाधव यांनी युक्तिवाद केला, तर बारामती येथील ॲड. बापूसाहेब शिलवंत यांनी सहायक म्हणून काम पाहिले.