शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन, इंद्रायणी एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:48 IST

मुंबईत मागील आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुणे-मुंबईदरम्यान दररोज एक-दोन गाड्या रद्द कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देवसई रोड येथे पाणी तुंबल्याने काही गाड्यांच्या मार्गात बदल

पुणे : रेल्वे प्रवाशांना मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा दररोज फटका बसत आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी व बुधवारीही डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या दोन्ही बाजूने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. मुंबईत मागील आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुणे-मुंबईदरम्यान दररोज एक-दोन गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेसच्या प्रवाशांना बसत आहे. रेल्वेकडून या दोनच गाड्या सातत्याने रद्द केल्या जात आहेत. मुंबईत पावसाची संततधार कायम असल्याने मंगळवारी (दि. १०) व बुधवारी (दि. ११) डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेस तसेच पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दोन्ही दिवस दौंड-मनमाडमार्गे धावेल.वसई रोड येथे पाणी तुंबल्याने काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पुणे-हजरत निझामुद्दीन दुरोंतो एक्सप्रेस ही गाडी मंगळवारी दौंड-मनमाड-खांडवा-भोपाळ या मार्गावर सोडण्यात आली. तुतीकोरीन-ओखा विवेक एक्सप्रेसला इगतपुरी-मनमाड-जळगाव मार्गावरून तर यशवंतपुर-बारमेर एक्सप्रेसला इगतपुरी-भुसावळ-खांडवा-भोपाळ-रतलाम या मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.-------------

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वेPuneपुणे