शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन बसस्थानक परिसर मुली, महिलांसाठी डोकेदुखी; टवाळखोरांना आवर घालण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:47 IST

शहराच्या विविध भागांतून येणारे अनेक विद्यार्थी ‘पीएमपी’च्या डेक्कन जिमखाना बसस्थानकातून बसने ये-जा करीत असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. याचाच फायदा घेत काही टवाळखोर मुले महिला व मुलींना त्रास देतात. 

ठळक मुद्देसकाळ-सायंकाळी नेहमीच गर्दी, याचाच फायदा घेत टवाळखोर मुले महिला व मुलींना देतात त्रास टवाळखोर मुलांमध्ये शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयांतील मुलांचाही सहभाग

लोकमत पाहणी

टीम लोकमत : राजानंद मोरे, वृषाली केदार, गायत्री श्रीगोंदेकर, राहुल दळवी, रजत खामकर 

पुणे : नेहमीच प्रवाशांची वर्दळ असलेल्या डेक्कन जिमखाना बसस्थानकांमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिला प्रवाशांना टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच अनेकदा ज्येष्ठ नागरिकही त्याला बळी पडत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले. शहरातील इतर बसस्थानके तसेच बसमध्येही असा त्रास असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पीएमपी’च्या डेक्कन जिमखाना बसस्थानकावर प्रवाशांची सातत्याने मोठी गर्दी असते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, तसेच अनेक भागांत या स्थानकातून बसेसची ये-जा असल्याने प्रवासी या स्थानकाला पसंती देतात. या स्थानकालगत असलेल्या डेक्कन, शिवाजीनगर या भागात शाळा-महाविद्यालये आहेत. शहराच्या विविध भागांतून येणारे अनेक विद्यार्थी या स्थानकातून बसने ये-जा करीत असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. याचाच फायदा घेत काही टवाळखोर मुले महिला व मुलींना त्रास देतात. डेक्कन बसस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की टवाळखोर मुलांमध्ये शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयांतील मुलांचाही सहभाग आहे. याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार करूनही काही बदल झालेला नाही. तसेच मुली आमच्याकडे तक्रार करतात, तेव्हा आम्ही १०० क्रमांकावर संपर्क साधून मदत मागतो.  

अनेक ठिकाणी हाच त्रासकेवळ डेक्कनच नव्हे, तर शहरात अनेक ठिकाणी मुलींना अशा त्रासाला सामोरे जावे लागते. पीएमपी प्रशासनाकडून टवाळखोर मुलांवर वचक बसविण्यासाठी शहरांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी अनेकदा तक्रार दिली आहे. पूलगेट, डेक्कन जिमखाना, येरवडा, कर्वे रस्ता यांसह विविध भागांतून अशा तक्रारी येत असतात. त्यानुसार स्थानिक पोलिसांकडे तक्रारी केल्या जातात. पोलिसांकडून गर्दीच्या वेळी गस्त घातली जात असली तर त्यानंतर या मुलांचा त्रास सुरूच असतो, असे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरवाजातच करतात गर्दीठराविक बसस्थानकांमध्ये मुले बसमध्ये चढल्यानंतर दरवाजातच गर्दी करतात. तिथे उभे राहून शेरेबाजी करणे, इतर प्रवाशांची अडवणूक केली जाते. पुढील स्थानक आल्यानंतर मुली-महिलांना आत चढतानाही त्रास होतो. वाहकाकडून अनेकदा त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यांच्याकडून दाद दिली जात नाही. पीएमपी कर्मचाऱ्यांसोबतही ते वाद घालतात.

टॅग्स :Puneपुणे