शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या कार्यालय वाटपावरून वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 13:18 IST

नवीन संपूर्ण चार मजली इमारत केवळ पदाधिका-यांसाठी देण्यात आली असली तरी, सध्या कोणाला कोणते कार्यालय व किती जागा यावरून वाद सुरु आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचा वाटपापूर्वीच प्रशस्त कार्यालयावर ताबा सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रांवर चार मजली इमारत मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा आणि अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिमनवीन इमारतीत सर्व पदाधिका-यांचे कार्यालयात स्थलांतरीत होणार असल्याचे स्पष्ट

पुणे: महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप पदाधिका-यांची कार्यालय स्थलांतरीत झालेली नाही. नवीन संपूर्ण चार मजली इमारत केवळ पदाधिका-यांसाठी देण्यात आली असली तरी, सध्या कोणाला कोणते कार्यालय व किती जागा यावरून वाद सुरु आहे. यामुळे फर्निचरचे काम पूर्ण होऊन देखील अद्याप पदाधिकारी नविन जागेत स्थलांतरीत झालेले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयांच्या जागा वाटपाचा वाद सुरु असल्याने अखेर बुधवारी शिवसेने  दुस-या मजल्या वरील सभागृह नेत्याच्या समोरील जागेवर शिवसेनेचे नाव टाकून ताबा मारला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेली जागा कमी पडत असल्याने शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रांवर चार मजली इमारत बांधली आहे. तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करून भव्या चार मजली इमारत बाधण्यात आली आहे. या इमारतीत ७२ फूट व्यासाचे गोल घुमटाचे महापालिकेचे मुख्य सभागृह, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते विविध पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये, तसेच समित्यांच्या अध्यक्षांची कार्यालय, नगरसचिव कार्यालय असणार आहेत. ही नविन विस्तारित इमारत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असून, त्यामध्ये अद्ययावत वातानुकूलित यंत्रणा, ६ लिफ्ट, एलईडी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा आणि अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिम बसविण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म सिस्टिम बसविण्यात आली आहे. तर फर्निचर व अन्य गोष्टींवरच तब्बल २८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.परंतु, सध्या इमारतीत पदाधिका-यांच्या कार्यालयाच्या जागा वाटपावरून वाद सुरु असून, महापौर कार्यालयासाठी तिस-या मजल्यावर मुख्य सभागृहाच्या समोरची जाग निश्चित झाली असून, महापौर मुक्ता टिळक यांनी अनौपचारिक कार्यालय प्रवेश केला आहे. परंतु, दुस-या मजल्यावरील कार्यालयाच्या जागा वाटपा वरून वाद सुरु आहेत. यामध्ये दुस-या मजल्यावर उपमापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, शहर सुधारणा समिती, विरोधीपक्ष नेत्यांना कार्यालय देण्याचे जवळजवळ निश्चित करण्यात आले आहे. तर सर्व पक्षाचे गटनेते, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, क्रीडा समिती आणि पीएमपीएमएल संचालक समिती अशा सर्वांसाठी पहिल्या मजल्यावर कार्यालय देण्यात येणार आहेत. यावरूनच वाद सुरु असून, सर्व पक्षाच्या गटनेत्यांना दुस-या मजल्यावरच कार्यालय पाहिजेत. त्यामुळे हा वाद मिटल्यानंतरच नवीन इमारतीत सर्व पदाधिका-यांचे कार्यालयात स्थलांतरीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका