शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:45 IST

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे.

ठळक मुद्देकुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांनी दिली फिर्यादअज्ञात वाहनचालकाविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल

लोणी काळभोर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे.या अपघातात बालाजी शिवाजी शिंदे (वय ३५, रा. रामतीर्थ, ता. निलंगा, जि. लातूर) हे मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद मच्छिंद्र कुंजीर (वय ३९, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरिक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (बुधवार, दि. २०) पहाटे घडला आहे. यातील मृत बालाजी शिंदे हे कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हॉटेल श्रीनाथ समोरून पायी चालत जात असताना त्यांना अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने त्यांच्या कंबरेखालच्या भागावरून चाक गेले. यात ते जागीच मृत्यूमुखी पडले. आज सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सर्व्हिस रोडच्या उत्तरेस पडलेला आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांना ही बाब ८ वाजण्याच्या सुमारास समजली, ते लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहचल्यानंतर मृत व्यक्तीच्या खिशात वाहन चालवण्याचा परवाना व काही कागदपत्र मिळाली. त्यामध्ये असलेल्या एका मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर त्यांची ओळख पटली. 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे