पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: March 15, 2017 03:24 IST2017-03-15T03:24:04+5:302017-03-15T03:24:04+5:30
मित्रांसमवेत भराडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक घोड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या स्वप्निल शंकर हिंगे (वय ३३, रा. खालचा शिवार, अवसरी बुद्रुक) या तरुणाचा

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू
मंचर : मित्रांसमवेत भराडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक घोड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या स्वप्निल शंकर हिंगे (वय ३३, रा. खालचा शिवार, अवसरी बुद्रुक) या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एनडीआरएफच्या टीमने २४ तासांनंतर स्वप्निल हिंगे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.
अवसरी बुद्रुक गावाचा खालचा शिवार येथील स्वप्निल शंकर हिंगे हा तरुण मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. स्वप्निलचे मुंबई येथून आलेले मित्र व तो घोडनदीतील भराडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पोहण्यासाठी गेले. भराडी बंधारा पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे. बंधाऱ्याचा खालील बाजूस वाहते पाणी असून हे तरुण तेथील पाण्यात काल सायंकाळी साडेपाच वाजता पोहण्यासाठी गेले. स्वप्निलचे मित्र पोहून बाहेर आले. मात्र, स्वप्निल पाण्याच्या भोवऱ्यात अडकला. पाण्यात बुडालेला स्वप्निल बाहेर न आल्याने मित्रांनी आरडाओरडा केला. स्वप्निलच्या घरी या घटनेची माहिती देण्यात आली.
स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी आले. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी पाण्यात बुड्या मारून स्वप्निलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
रात्री अंधार पडल्यावर शोधकार्य थांबविण्यात आले. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक मच्छीमारांनी शोधकार्यात सहभाग घेतला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी एनडीआरएफच्या टीमशी संपर्क साधल्यानंतर दुपारी एनडीआरएफची टीम भराडी येथील बंधाऱ्यावर आली. इन्स्पेक्टर एस. बी. इंगळे यांच्यासह १२ जवानांनी शोधकार्याला सुरुवात केली. बोटीच्या साह्याने आॅक्सिजन मास्क घातलेला जवान पाहण्यात उतरून स्वप्निल हिंगे याचा शोध घेत होता.