शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गोडाऊनच्या छतावरून पडून युवा उद्योजकाचा मृत्यू, खराबवाडीतील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:27 PM

साप्ताहिक सुट्टी असल्याने कंपनी बंद होती, त्यामुळे कंपनीच्या छतावर पत्रा दुरूस्तीसाठी चढले होते.

ठळक मुद्देखराबवाडी येथील युवा उद्योजक पोपट सोमवंशी यांचा इंडस्ट्रियल गोडाऊनचा व्यवसाय

चाकण : खराबवाडी (ता.खेड ) येथील युवा उद्योजक पोपट महादेव सोमवंशी (वय ४५, रा.खराबवाडी, चाकण ) यांचा कंपनीच्या छतावर पत्रा दुरूस्तीसाठी गेले असता पत्रा फुटुन गोडाऊनच्या छतावरून खाली पडून मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली. गुरुवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सोमवंशी हे आपल्या ईर्टिगा गाडीतून आल्याचे व गोडाऊनवर चढण्यासाठी शेजारील दीक्षा कंपनीच्या समोरील शिडी गोडाऊनला लावल्याचे चित्रण दीक्षा कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. गावातील मनमिळावू व शांत स्वभावासाठी व कुणाच्याही मध्यात न पडणारे सोमवंशी हे सर्वांसाठी परिचित होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी ( दि. २१ ) रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. याबाबतची खबर सदाशिव मल्लीकार्जुन आकुसकर ( वय ३०, धंदा ड्रायव्हर, रा. खराबवाडी, जंबुकर वस्ती, ता. खेड जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आज ( दि. २२ ) रोजी आकस्मिक मयत म्हणून नोंद केली आहे. गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने कंपनी बंद होती, त्यामुळे पत्रा दुरुस्तीचे काम करण्यासाठी ते गोडाऊनवर चढले होते. आज शुक्रवारी ( दि. २२ ) सकाळी ९ च्या सुमारास कामगारांनी कंपनीचे शटर खोलले असता घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील युवा उद्योजक पोपट सोमवंशी यांचा इंडस्ट्रियल गोडाऊनचा व्यवसाय असून त्यांनी सोमवंशी इंडस्ट्रीज मधील एक गोडावून विनोद विजय सावळे (वय ३२, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, खराबवाडी, चाकण ) यांच्या काँक्रीटेक इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिले आहे. सोमवंशी हे गुरुवारी ( दि. २१ ) रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास शेतात जातो असे घरामध्ये सांगून गेले होते. सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी ते आपल्या गोडावून कडे आपल्या ईर्टिगा गाडी क्रमांक ( एम. एच. १४ ईयू ५७३४ ) मधून गोडाऊनकडे जाऊन गाडी पार्किंग करून मोबाईल रिंग वाजत असूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने व ते घरी न परतल्याने त्यांची पत्नी सुशीला यांनी चाकण पोलीस ठाण्यात आपले पती बेपत्ता असल्याची खबर दिली होती. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र मोरे हे पुढील तपास करीत आहे. 

सोमवंशी ह्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक  मुलगा, भाऊ, भावजय, तीन बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. उद्योजक संभाजी सोमवंशी यांचे ते धाकटे बंधू, भाजपच्या जिल्हाध्यक्षा क्रांती सोमवंशी यांचे ते सासरे, भाजपचे संपर्क प्रमुख संदीप सोमवंशी यांचे ते चुलते, माजी सरपंच योजना सोमवंशी व माजी सदस्या साधना सोमवंशी यांचे ते दीर, तर राष्ट्रवादीचे खेड तालुका खजिनदार अरुण सोमवंशी यांचे ते बंधू होत.  

टॅग्स :KhedखेडChakanचाकणDeathमृत्यूPoliceपोलिस