शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुतारवाडी येथील एचईएमआरएल कंपनीतल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:05 IST

सुतारवाडी येथील उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) या संरक्षण विभागाच्या कंपनीत ज्वलनशील पदार्थाचे सॅम्पल घेत असताना त्याने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत एका कामगाराचा भाजून मृत्यू झाला तर, दुसरा कामगार जखमी झाला आहे.

पुणे : सुतारवाडी येथील उच्च ऊर्जा सामुग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) या संरक्षण विभागाच्या कंपनीत ज्वलनशील पदार्थाचे सॅम्पल घेत असताना त्याने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत एका कामगाराचा भाजून मृत्यू झाला तर, दुसरा कामगार जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता सुतारवाडी येथील कंपनीत घडली. लक्ष्मीकांत रमेश सोनवणे (वय २६, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर योगेश कीर्तिकर हे भाजून जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.एचईएमआरएल ही संरक्षण खात्याच्या अंतर्गत काम करणारी कंपनी असून पाषाण येथील सुतारवाडीमध्ये १९६० सालापासून ती कार्यरत आहे. संरक्षण दलाला लागणाऱ्या उच्च स्फोटक द्रव्ये अन्य सामुग्रीचे संशोधन व चाचणी येथे केली जाते. याबाबत पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मीकांत सोनावणे हे मंगळवारी दुपारी ज्वलनशील पदार्थाचे सॅम्पल घेण्याचे काम करीत होते. त्यावेळी या ज्वलनशील पदार्थाने अचानक पेट घेतल्याने त्या ठिकाणी आग लागली. या आगीत त्यांचा भाजून मृत्यू झाला. तसेच त्यांच्याबरोबर तेथे काम करणारे योगेश कीर्तिकर हेही भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :Puneपुणेfireआग