शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दाेघांच्या भांडणात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 16:22 IST

किरकाेळ अपघातानंतर भांडण करत बसल्याने रिक्षातील महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी रिक्षाचालक अाणि दुचाकीस्वार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : मित्रमंडळ चाैकात दुचाकी चालक अाणि एका रिक्षाचा किरकाेळ अपघात झाला. अपघातानंतर दाेघेही भांडत बसले. भांडण चालू असताना रिक्षातून प्रवास करणाऱ्या 65 वर्षीय महिलेला अस्वस्थ वाटू लागले. त्या रिक्षातून खाली उतरुन रस्त्याच्या कडेला बसल्या, त्यांना अाजूबाजूच्या लाेकांनी पाणी दिले. तरीही ते दाेघे भांडतच हाेते. त्या महिलेला चक्कर अाल्याने त्यांना नागरिकांनी दुसऱ्या एका रिक्षातून हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किरकाेळ अपघातात भांडत बसत महिलेला रुग्णालयात दाखल न करणाऱ्या बेजबाबदार रिक्षाचालक अाणि दुचाकीस्वाराविरुद्ध दत्तवाडी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.     रिक्षाचालक व दुचाकीस्वाराची अद्याप अाेळख पटली नसून त्यांचा शाेध पाेलीस घेत अाहेत. वत्सला केरबा डाेईफाेडे (वय 65, रा. नेरळ, नवी मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव अाहे. पाेलीस उपनिरिक्षक विकास जाधव यांनी याप्रकरणी दत्तवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डाेईफाेडे या त्यांच्या एका नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी पुण्यात अाल्या हाेत्या. शुक्रवारी (27 एप्रिल) दुपारी बाराच्या सुमारास डाेईफाेडे या रिक्षातून प्रवास करीत हाेत्या. मित्र मंडळ चाैकात रिक्षाचा अाणि दुचाकीस्वाराचा किरकाेळ अपघात झाला. अपघातानंतर दाेघांनी रस्त्यातच भांडायला सुरुवात केली. दरम्यान डाेईफाेडे यांना चक्कर आल्याने त्या रिक्षातून उतरल्या, त्यानंतर त्या लगेचच बेशुद्ध पडल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. डाेईफाेडे यांना रुग्णालयात दाखल करण्याएेवजी भांडत बसून तेथून पसार झाल्याने रिक्षाचालक अाणि दुचाकीचालकावर कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. चाैकातील सीसीटिव्हीच्या आधारे त्या दाेघांचा शाेध पाेलीस अाता घेत अाहेत. दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल अाल्यानंतर डाेईफाेडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू