स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 24, 2017 04:29 IST2017-03-24T04:29:53+5:302017-03-24T04:29:53+5:30

शहरात स्वाइन फ्लूने एका ६० वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या १८ झाली आहे.

Death of a woman by swine flu | स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

पुणे : शहरात स्वाइन फ्लूने एका ६० वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या १८ झाली आहे. शहरात जानेवारी महिन्यापासून १०९ रुग्णांची नोंद झाली असून, सध्या १८ रुग्णांचा मृत्यू झाला, ६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या २८ स्वाइन फ्लूचे रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांतील ११ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे.
पुण्यातील ६० वर्षीय महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी १९ मार्च रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. २० मार्च रोजी रुग्णाला स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. रुग्णामध्ये स्वाइन फ्लूसह रेस्पिरेटरी फेल्युअरचे निदान झाले होते. दि. २३ मार्च रोजी पहाटे महिलेचा मृत्यू झाला.

Web Title: Death of a woman by swine flu