दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST2021-09-11T04:11:22+5:302021-09-11T04:11:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी करून घरी निघालेल्या महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घसरून तिचा मृत्यू झाला. ...

Death of a woman cyclist | दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी करून घरी निघालेल्या महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घसरून तिचा मृत्यू झाला. नगर रस्त्यावर ही घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेला किरकोळ दुखापत झाली.

अनिता मंगेश विधाते (वय ३१, रा. काळूबाईनगर, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अनिता आणि त्यांची आई संगीता पांडुरंग जाधव (वय ५२) नगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकीस्वार अनिता आणि त्यांची आई संगीता वाघोलीकडे निघाल्या होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात त्यांची दुचाकी घसरली आणि दुचाकीस्वार अनिता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. ९) त्यांचा ससून रुग्णालयात रात्री मृत्यू झाला. सहायक निरीक्षक शिवशांत खोसे तपास करीत आहेत.

-------------------------------------------

Web Title: Death of a woman cyclist